Chanakya Niti: संकटात सगळे साथ सोडतात फक्त ‘ही’ गोष्ट देते साथ


Chanakya Niti :  आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीति (Chanakya Niti) मध्ये नात्याबद्दल सविस्तर स्वरूपात सांगण्यात आलं आहे. चाणक्य नीतीमध्ये पती, पत्नी, गुरु, राजा किंवा समाजातील इतर व्यक्ती कसे असावेत हे देखील सांगितले आहे. चाणक्य नीतीमध्ये ‘बाहुवीर्यबलं राज्ञो ब्राह्मणो ब्रह्मविद् बली। रूप-यौवन-माधुर्यं स्त्रीणां बलमनुत्तमम्। ज्यामध्ये स्त्री, ब्राह्मण आणि राजा यांची शक्ती सांगितली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

ब्राह्मणाची शक्ती काय आहे? (Power of Brahman)
आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीतिमध्ये सांगितले आहे की ब्राह्मणाची सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्याचं ज्ञान. ब्राह्मणांना त्यांच्या ज्ञानामुळे समाजात मान मिळतो. ब्राह्मणाकडे जितके ज्ञान असेल तितकाच त्यांना आदर मिळतो. कारण संकटात सर्वजण साथ सोतात, परंतु ज्ञान त्याला कधीच एकटं सोडत नाही. त्यामुळे ब्राह्मणासाठी ज्ञान सर्वात मोठं धन आहे. 

महिलांची सर्वात मोठी ताकद (Women’s greatest strength)
चाणक्य नीतीनुसार, कोणत्याही स्त्रीचं सौंदर्य आणि गोड वाणी (The beauty of a woman) ही तिची सर्वात मोठी ताकद असते. ज्या महिलांमध्ये हे दोन गुण असतात अशा महिलांकडे पुरुष लवकर आकर्षित होतात. सुंदर आणि गोड बोलणाऱ्या स्त्रिया कोणालाही आकर्षित करू शकतात. मात्र, या दोन गुणांमुळे महिलांना सर्वत्र मान-सन्मानही मिळतो आणि कुटुंबाचा मानही वाढतो.

राजामध्ये असं गुण असणे आवश्यक
चाणक्य नीतीनुसार, राजाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची शक्ती. राजाकडे मंत्रीपासून ते सेनापती पर्यंत प्रत्येक जण असतो. पण जर राजाकडे शक्ती नसेल तर, राज्य करु शकत नाही. राज्य चालवायचे असेल तर राजा शक्तिशाली असणे आवश्यक आहे.  (A king must have this quality)

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)Source link

Leave a Reply