Challenge! KGF चित्रपटाबद्दल आतापर्यंत कधीच न पाहिलेली ‘ही’ माहिती तुम्हालाही थक्क करेल


मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता  Yash यश, याची मुख्य भूमिका असणाऱ्या KGF chapter 1 या चित्रपटानं दमदार कामगिरी केली. फक्त दक्षिणेकडेच नव्हे, तर विविधभाषी प्रेक्षकांवरही या चित्रपटाची जादू पाहायला मिळाली. ज्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. 

चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला तेव्हा त्यातील मुख्य अभिनेत्यापासून ते अगदी इतर कलाकारांपर्यंतची माहिती जाणून घेण्यासाठी चाहत्यांनी उत्सुकता दाखवली. 

पाहता पाहता  Yash  आणि इतर बऱ्याच गोष्टींबाबतची माहिती समोर आली. आता म्हणे चित्रपटाशी संबंधीत आणखी एक गोष्ट सर्वांनाच थक्क करत आहे. 

ही गोष्ट आहे चित्रपटाच्या पहिल्या भागात खलनायकी भूमिकेत दिसलेल्या गरुडा म्हणजेच रामनंद्र राजूबद्दलची. 

रामचंद्रनं या चित्रपटामध्ये असा खलनायक साकारला जो प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला. पण, तुम्हाला माहितीये का? हा चेहरा अभिनयाकडे येण्यापूर्वी एक बॉडीगार्ड म्हणून काम पाहत होता. 

चित्रपटांच्या जगताशी काहीही संबध नसणारा रामचंद्र अभिनेता यशचाच बॉडीगार्ड होता. त्यानं कधी स्वप्नातही आपण अभिनयाकडे वळू असा विचार केला नसेल. 

GF garuda

कशी झाली निवड? 
केजीएफचे लेखक चित्रपटाती स्क्रीप्ट आणि इतर चर्चा करण्यासाठी यशकडे आले होते. तेव्हाच त्यांनी रामचंद्रला पाहिलं. पाहताक्षणी त्यांनी त्याची निवड गरुडा या पात्रासाठी केली. 

फक्त एकदाच लेखकाने त्याला ऑडिशन द्यायला सांगितलं आणि बस्स, मग काय लगेचच त्याला या चित्रपटासाठी निवडण्यात आलं. 

पाहतापाहता रामचंद्रचं नशीब फळफळलं आणि त्याला रातोरात प्रसिद्धी मिळाली. Source link

Leave a Reply