Headlines

Celebrity Phobia : कोणाला पंख्याची तर कोणाला वाटते फळांची भीती; पाहा सेलिब्रिटींचे चक्रावणार Phobia

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेता चित्रपटात अनेक अॅक्शन सीन देताना दिसतात. त्यामुळे त्यांना कोणत्या ही गोष्टीची भीती नाही असं नेहमीच त्यांच्या चाहत्यांना वाटतं. कोणी कितीही धाडस दाखवलं तरी प्रत्येकाला एखाद्या गोष्टीची नक्कीच  गोष्टीची नक्कीच भीती असते. त्यापैकी असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यापैकी कोणी सीलिंगला असलेल्या पंख्याला घाबरत तर कोणी फळांना. जाणून घेऊयात कोण आहेत हे कलाकार…

शाहरुख खान (Shahrukh Khan)

बॉलिवूडचा (King Khan Shahrukh Khan) किंग खान शाहरुख खान इक्विनोफोबिया (Equinophobia) आहे. याचा अर्थ शाहरुखला घोड्याची भीती वाटते. खरं तर यामागचं कारण हे ‘करण अर्जुन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका सीन आहे. सीनमध्ये घोड्यावर स्वार होत असताना शाहरुख जखमी झाला होता. तेव्हापासून घोड्याबद्दल त्याच्या मनात भीती बसली (Shahrukh Khan is Scare Of Horses).

सलमान खान (Salman Khan)
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) चित्रपटात अॅक्शन सीन्स करताना दिसतो. त्याला पडद्यावर पाहून त्याला कशाचीही भीती वाटत नाही असं सगळ्यांना वाटतं. पण, सलमानला क्लॉस्ट्रोफोबिया (Claustrophobia)आहे. खरं तर, ही एक भीती आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला बंदिस्त जागेची भीती वाटते. अशीच भीती सलमानला आहे. यामुळेच त्याला लिफ्टची खूप भीती वाटते. एका शोदरम्यान सलमान म्हणाला होता की, लिफ्टमध्ये असताना अशी भीती असते की कधी ती खाली पडेल किंवा पडेल किंवा मध्येच थांबेल.

आणखी वाचा : Divorce नंतरही समांथाला विसरू शकला नाही नागा चैतन्य, जपून ठेवलीये शेवटची निशाणी

अर्जुन कपूर (Arjun Kapoor)
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) सिलिंगला असलेल्या पंख्याची भीती वाटते (Aanemistiraphobia), त्यामुळे त्याच्या घरात एकही पंखा नाही. एका मुलाखतीत अर्जुननं खुलासा केला होता की, त्याला सिलिंग फॅन्सची इतकी भीती आहे की त्याच्या घरात एकही पंखा लावलेला नाही. पंखा असलेल्या खोलीत राहण्यासही तो नकार देतो.

अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan)
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा फळांना घाबरतो. रिपोर्ट्सनुसार, त्याला फ्रक्टोफोबिया (Fructophobia)आहे. अभिषेकला फळांची भीती वाटते, त्यामुळे त्याला कोणतेही फळ खायला आवडत नाही. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, ज्युनियर बच्चन यांनी कधीही कोणतेही फळ खाल्ले नाही. फळांकडे पाहणेही तो टाळतो.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *