Headlines

CBSE – दहावी , बारावीच्या परीक्षा होणार ऑफलाईन

दिल्ली/वृत्तसंस्था – (सीबीएसई )केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड ने गुरुवारी घोषणा केली की दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा दोन टर्म मध्ये आयोजित केली जाईल. परीक्षा ऑफलाइन पद्धतीने नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होईल.

सीबीएसई ने सांगितले की पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर महिन्यामध्ये आयोजित केली जाईल. दुसऱ्या सत्राची परीक्षा मार्च किंवा एप्रिलमध्ये आयोजित करण्यात येईल. प्रत्येक पेपर साठी ९० मिनिटाचा कालावधी असेल. परीक्षामध्ये प्रश्न वस्तुनिष्ठ पद्धतीचे प्रश्न विचारले जातील.सीबीएसई ने सांगितले की थंडीमुळे परीक्षा सकाळी १०.३० ऐवजी ११.३० ला सुरू होईल.

सीबीएसई बोर्ड ने परीक्षा आयोजित करण्यासाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. यामध्ये म्हटले आहे की कोरोना नियमावलीचे पालन करत एका वर्गात फक्त २० विद्यार्थ्यांना पेपरसाठी बसण्याची परवानगी देण्यात येईल.

Leave a Reply