
वट सावित्री की विवेक सावित्री ?
आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक तथाकथित सावित्री वडाच्या दिशेने जातील,सुताचा धागा हाती घेत वडाला फेर्या मारतील आणि जन्मोजन्मी सात जन्मी हाच नवरा मिळावा असं म्हणत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना करतील. दुसऱ्या बाजूला या कर्मकांडाला शास्त्रीय आधार देण्याचा तकलादू प्रयत्न होईल. वड किती ऑक्सिजन सोडतो वगैरे वगैरे म्हणत या कर्मकांडाचं उदात्तीकरण करण्यात येईल. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या…