Headlines

लग्नातील खर्चिक कार्यक्रमाला फाटा देत सुर्डीच्या शेख कुटुंबियांनी केली सामाजिक संस्थेला मदत

वैराग /प्रतिंनिधी – लग्नातील अवाढव्य आणि खर्चिक कार्यक्रमाला फाटा देत बार्शी तालुक्यातील सुर्डीच्या शेख कुटुंबियांनी आपल्या मुलाच्या लग्नात प्रार्थना फाउंडेशन या सामाजिक चळवळीत काम करणार्‍या संस्थेला 11 हजार 111 रुपयांची मदत केली. त्यांच्या ह्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोल्हापूर येथे पत्रकारिता करणारे पैलवान मतीन शेख यांचा विवाह वैराग येथील युसुफ सय्यद यांच्या मुलीशी 14…

Read More

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना

शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करताना यंत्रांचा उपयोग वाढला आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे करण्यासाठी, यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतीमाल बाजारात पोहचविण्याकरीता बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता असते. असे रस्ते तयार करून शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’…

Read More

लाखीमपुर खेरी येथील शेतकरी हत्याकांडातील शहीद शेतकऱ्यांचा अस्थिकलश येणार बार्शीत

बार्शी / प्रतिनिधी -उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खेरी येथे झालेल्या चार शेतकरी हत्याकांडाच्या मधील शहीद शेतकऱ्यांचा अस्थिकलश दिनांक 11 नोव्हेंबर 2021 गुरुवार रोजी बार्शी तालुक्यामध्ये येणार आहे. पुणे कोल्हापूर मार्गे निघालेला हा अस्थिकलश श्रीपतपिंपरी येथे प्रथमतः येऊन तेथे त्याला अभिवादन केले जाईल. पुढे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सायंकाळी सहा वाजता शहीद शेतकरी अस्थिकलशाला अभिवादन करणारी सभा…

Read More

ऑक्सिजन अभावी मृत्यू होऊ नये म्हणून बार्शीतील तरूणींकडून 250 झाडे मोफत वाटप

बार्शी / प्रतिनिधी – कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन अभावी अनेक जणांचे बळी गेले असल्याने सर्व मृत्य व्यक्तींना श्रध्दांजली अर्पण व्हावी तसेच ऑक्सिजनची गरज किती महत्वाची आहे हे महत्व पटवून देण्यासाठी पोलिस भरतीची तयारी करीत असलेली शालेय तरुणी अमू जठार हिने लॉकडाऊनच्या काळात सुमारे 250 झाडे नागरिकांना मोफत वाटप करण्याचा संकल्प केला होता. दि. 21 मे…

Read More
rainforest during foggy day

अतिवृष्टी मध्ये पिकाचे नुकसान झाले असेल तर तात्काळ विमा कंपनीकडे दावा करण्याचे शिवार हेल्पलाइन चे आवाहन ७२ तासाच्या आत दावा करण्याची अट

उस्मानाबाद :- गेल्या एक दोन वर्षापासून शेतकऱ्यांवर संकटांची मालिका सतत सुरू आहे. कोरोना च्या वेगवेगळ्या लाटा, अवकाळी पाऊस, शेतमालाला भाव न मिळणे, वाढलेले खते/बियाणे चे दर इत्यादी विषय बळीराजा मागे हात धुवून लागले आहेत. पेरणी झाली की पावसाने उघडीप दिली आणि अचानक उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. पाडोळी (आ.), सलगरा, ईटकळ,…

Read More

प्रत्येक गावात वृक्ष लागवडीचे शतक करुन गाव देवराई करा- सिनेअभिनेते सयाजी शिंदे

सरपंच परिषदेच्या माध्यमातून राज्यात इतिहास घडेल- सयाजी शिंदे पुणे -जांभुळ,चिंच,आवळा अशी 500 झाडे लावून पाच वर्ष जपली तर ते गाव आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील. या भुमीवर वाईट झाड जन्माला येत नाही ते कशासाठी व कुणासाठी तरी उपयोगी पडतात फक्त गावात झाडे लाऊन ती जपा असे आवहान सह्याद्री देवराईचे संस्थापक सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी केले. सरपंच…

Read More

उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले यांच्या हस्ते यशोदा पार्क येथे वृक्षारोपण

बार्शी/प्रतिनिधी – आज यशोदा पार्क(कासारवाडी रोड)येथे वृक्ष संवर्धन समिती,जाणीव फाऊंडेशन यांच्या सहकार्याने बार्शी नगरपरिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष मा.कृष्णराज तथा नानासाहेब बारबोले यांच्या प्रमुख उपस्थित सुमारे ७० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी मा.नानासाहेब बारबोले यांनी,यशोदा पार्क मित्रमंडळाचे वतीने या परिसरात नेहमीच होत असलेल्या विविध सामुदायिक कामाचे कौतुक करीत.या परिसरातील समस्यांबाबत वेळोवेळी मदत करण्याचे आश्वस्त केले. याझाडांच्या वाढीसाठी व…

Read More

9500 किलोमीटरचा सायकलवरून प्रवास करत सांगली जिल्ह्यात आलेली पर्यावरण संवर्धन यात्री प्रणाली चिकटे सोबत आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडची बैठक , पर्यावरण रक्षणाच्या विविध मुद्द्यांवर झाली चर्चा

सांगली/विशेष प्रतिंनिधी – पुनवत ता.वणी जिल्हा यवतमाळ येथील प्रणाली बेबीताई विठ्ठल चिकटे ही 21 वर्षांची तरुणी ही पर्यावरण संवर्धन यात्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आत्तापर्यंत बावीस जिल्हे फिरून 9500 किलोमीटरचा प्रवास करत सांगली जिल्ह्यात आलेली आहे. काल प्रणाली सोबत आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड या संघटनेची क्रांती स्मृतीवन बलवडी येथे संवाद…

Read More

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणवादी योद्धा अनिल अगरवाल यांना आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडची आदरांजली

  क्रांती स्मृतीवनात ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते भाई संपतराव पवार यांचा केला सत्कार व वृक्षारोपण  सांगली/विशेष प्रतिनिधी- 5 जून जागतिक पर्यावरण दिन ‘आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र’या सामाजिक संघटनेने अनोख्या पद्धतीने साजरा केला.महाराष्ट्रातील ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते,क्रांती स्म्रतीवनाचेे निर्माते भाई संपतराव पवार यांची प्रत्यक्ष क्रांती स्मृती वनात जाऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भेट घेतली आणि त्यांचा भावपूर्ण…

Read More

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यशोदा पार्क येथे वृक्षारोपण

  बार्शी/प्रतिनिधी : आज जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने कासारवाडी रोडवरील यशोदा पार्क परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. बार्शी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मा.विश्वासभाऊ बोरबोले यांच्या शुभहस्ते व बार्शी वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष मा.उमेशजी काळे यांचेसह मंडळाचे मार्गदर्शक मा.लक्ष्मण लवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हनुमंत तिकटे यांनी केले.या औचित्याने प्रमुख मान्यवरांनी  यथोचित मनोगते व्यक्त केली.यावेळी…

Read More