Headlines

शिष्यवृत्ती जमा करावी तसेच सर्व वसतिगृहे लवकर सुरू करण्याची एआयएसफची मागणी

कोल्हापूर – 2017-18 सालापासून जवळपास 1200 विध्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्तीपासून, शासनाच्या व शिवाजी विद्यापीठ शिष्यवृत्ती विभागाच्या गचाळ कारभारामुळे वंचित रहावे लागले होते. AISF कोल्हापूरच्या सततच्या पाठपुराव्यामुळे 3 वर्षांपासून त्रुटींच्या दुरुस्तीमुळे रखडलेले काम पूर्ण करून, सर्व अर्ज विद्यापीठाने समाजकल्याण विभागाकडे पाठविले आहेत परंतु, बजेट नसल्याने पुन्हा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित रहावे लागत असल्याने, लवकरात लवकर बजेट मंजूर…

Read More

विद्यार्थ्यांकडे शिष्यवृत्तीचे पैसे मागणाऱ्या महाविद्यालयाविरुद्ध कारवाई होणार

मुंबई, दि. 23 : समाज कल्याण विभागामार्फत अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती ( scholarship ) तसेच राज्य शासनाच्या शिक्षण फी, परीक्षा फी प्रतिपूर्ती योजनेबाबत राज्यातील विविध महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांकडे रक्कम जमा करण्यासाठी मागणी होत आहे. तसेच कागदपत्र व निकाल देण्यासाठी अडवणुक होत असल्याबाबत विद्यार्थी व पालकांनी शासनाकडे तसेच राज्यातील समाज कल्याण विभागाच्या…

Read More

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आता ऑफलाईनही अर्ज करता येणार

मुंबई, दि. २१ : जात पडताळणी समितीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) देण्यात आली आहे.दिनांक 16 नोव्हेंबर 2021 पासून शैक्षणिक प्रकरणाच्या अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑनलाईन प्रणालीचा वेग…

Read More

…आणि भिंती बोलू लागल्या

सांगली – सुजाण नागरिक बनण्यासाठी मुलांच्या मनात बालवयापासूनच संस्कार मुल्ये रुजवली गेली पाहिजेत व शिक्षणातून सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, भविष्यातील समर्थ व सक्षम नागरिक घडले पाहिजेत, यासाठी कडेगांव तालुक्यातील हणमंत वडीये येथे येरळामाई जनसहयोग फाउंडेशनच्या वतीने ‘बोलक्या भिंती’ हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.(sangali) देशाची शिक्षण पद्धती ही देशाची मूल्ये जपणारी…

Read More

वंचित विद्यार्थ्यांसाठी स्नेहग्राम येथे परिवर्तनाच्या वाटा समूहाने उभारले ग्रंथालय

बार्शी – दि.14 नोव्हेंबर (प्रतिनिधी) बालदिनाचे औचित्य साधत बार्शी तालुक्यातील कोरफळे येथील स्नेहग्राम (Snehagram)या ठिकाणी वंचित विद्यार्थ्यांसाठी परिवर्तनाच्या वाटा समुहाच्या वतीने दोन लक्ष रुपयांचे ग्रंथालय उभारण्यात आले आहे.या ग्रंथालयाचे उद्घाटन राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमासाठी परभणीचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, करमाळ्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण…

Read More

लग्नातील खर्चिक कार्यक्रमाला फाटा देत सुर्डीच्या शेख कुटुंबियांनी केली सामाजिक संस्थेला मदत

वैराग /प्रतिंनिधी – लग्नातील अवाढव्य आणि खर्चिक कार्यक्रमाला फाटा देत बार्शी तालुक्यातील सुर्डीच्या शेख कुटुंबियांनी आपल्या मुलाच्या लग्नात प्रार्थना फाउंडेशन या सामाजिक चळवळीत काम करणार्‍या संस्थेला 11 हजार 111 रुपयांची मदत केली. त्यांच्या ह्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोल्हापूर येथे पत्रकारिता करणारे पैलवान मतीन शेख यांचा विवाह वैराग येथील युसुफ सय्यद यांच्या मुलीशी 14…

Read More

इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी १८ नोव्हेंबरपासून आवेदनपत्रे स्वीकारली जाणार; विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरावीत – शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन

मुंबई, दि. 17 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेची आवेदनपत्रे गुरूवार दि. 18 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. http://www.mahahsscboard.in या संकेस्थळावर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरावीत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. सदर परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव…

Read More

इ.१२वी च्या परीक्षांसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरवात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या इ.१२वी च्या परीक्षांसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आवेदनपत्रे १२ नोव्हेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने http://www. mahahsscboard.in येथे घेतले जातील. तपशील खालीलप्रमाणे

Read More

केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरीता ‘मार्जिन मनी’ उपलब्ध होण्यासाठी पात्र लाभार्थींना अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया या योजनेंतर्गत राज्याच्या अनुसूचित जातीच्या सवलती घेण्यासाठी पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरीता नवउद्योजक लाभार्थींनी ‘मार्जिन मनी’ भरण्याची क्षमता नसल्यामुळे या उद्योजक लाभार्थींना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी यांच्या हिश्यामधील 25 टक्के मधील जास्तीत जास्त 15 टक्के ‘मार्जिन मनी’ उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी इच्छुक नव उद्योजकांना…

Read More

प्रविण मस्तुद यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर.

बार्शी / प्रतिनिधी- प्रविण मच्छिंद्र मस्तुद यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे यांची पीएच.डी. पदवी दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी जाहीर करण्यात आली. वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन या विषयामध्ये त्यांनी ही पदवी संपादित केली आहे. “मराठी भाषिक वृत्तपत्रातून प्रकाशित होणाऱ्या व्यंगचित्र सदराच्या संदेशातून प्रसारित होणाऱ्या मूल्यांचा वाचकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास.” या शोधविषयाच्या प्रबंधास विद्यापीठाने मान्यता दिली असल्याचे…

Read More