जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार,जनावरांचे बाजार बंद

सोलापूर:- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज एक जून रोजी आठवडी बाजार बंद  करण्यासंदर्भात आदेश लागू केला आहे.सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, जनावरांचा बाजार, मॉल्स आता दिनांक 30 जून 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस होऊ शकते. त्यामुळे लोकांचा समूह एकत्र जमू नये यासाठी सर्व प्रकारचे आठवडी बाजार, जनावरांचे बाजार, मॉल्स भरवण्यास आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिला आहे. तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी           कोरोना या विषाणूंचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात पानपट्टी, मावा विक्री, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री केंद्र बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.  तंबाखूजन्य पदार्थ विक्री 30 जून 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत बंदी करण्यात आली आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी म्हटले आहे.

टोमॅटो पिकावरील नवीन तिरंगा विषाणूच्या टी.व्ही.-९ वरील दि.१५ मे, २०२० रोजीच्या बातमी बदल

महाराष्ट्र राज्यात टोमॅटो या भाजीपला पिकाची लागवड प्रामख्याने नाशिक,अहमदनगर,पुणे औरंगाबाद, नागपुर लातूर या जिल्हयात करण्यात येते. …

कोरोना प्रतिबंधासाठी डीपीसीमधून चार कोटी 15 लाख रुपये मंजूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

        सोलापूर दि. 14 : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनासाठी सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक…

राज्यातील धरणांची मान्सूनपूर्व तपासणी करून धोकादायक धरणांना भेटी देवून आवश्यक उपाययोजनांचा अहवाल तातडीने सादर करावा मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे आदेश

मुंबई, दि.११: राज्यातील लघु पाटबंधारे योजनांची मान्सूनपूर्व तपासणी करून धोकादायक धरणांना भेटी देवून आवश्यक उपाययोजनांचा अहवाल सादर…

विधानपरिषद द्वैवार्षिक निवडणूक १४ उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह १० उमेदवारांनी आपले…