Headlines

सावधान ! हॅकर्सची आहे तुमच्यावर नजर, या टिप्सच्या मदतीने डिव्हाइस ठेवा सेफ, पाहा डिटेल्स

[ad_1]

नवी दिल्ली: Smartphone Hacking: दिवसेंदिवस ऑनलाइन फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. तुम्हीही अनेक प्रकारची प्रकरणे तुमच्या समोर पाहिली असतील. अशा प्रकरणांपैकी एक म्हणजे फिशिंग. याद्वारे Cyber Criminals तुमची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती हॅक करतात . फिशिंगद्वारे, हॅकर्स Username, Passwords आणि डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड तपशील सारखा डेटा चोरतात. तसेच, बनावट ईमेल आयडी, वेबसाइट आणि मजकूर मेसेज तयार करून ते युजर्सना Fake Messages पाठवतात. या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. फिशिंग लिंक किंवा ईमेल ओळखण्यासाठी, खालील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

वाचा: Recharge Plans: अनलिमिटेड कॉल्ससह भरपूर डेटा देणाऱ्या ‘या’ प्लानची किंमत नाही जास्त, सिम देखील राहणार वर्षभर अॅक्टिव्ह

हॅकर्स बनावट लॉगिन पेजेस तयार करतात:

जर तुम्हाला एखादा ईमेल आला असेल ज्यामध्ये तुम्हाला धमक्या दिल्या जात असतील किंवा तुमचे नुकसान होईल असे सांगण्यात आले असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करा. हे सहसा फिशिंग ईमेल असतात. जर तुम्हाला लॉगिन डिटेल्स आर्थिक माहिती किंवा इतर वैयक्तिक तपशील विचारणारा असा कोणताही मेसेज मिळाला तर सतर्क राहणे आवश्यक आहे. हॅकर्स बनावट लॉगिन पेजेस तयार करतात. या लॉगिन लिंकसह ईमेल किंवा मेसेज असतो जो तुम्हाला बनावट पेजवर नेतो. वेबसाइट खरी आणि कायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत कोणत्याही वेबसाइटला भेट देऊन कोणतीही Information Enter करू नका.

वाचा: Charging Tips: एकदाच चार्ज करा स्मार्टफोन, २ दिवसांपर्यंत वापरा बिनधास्त, फॉलो करा ‘या’ सोपी ट्रिक्स

URL काळजीपूर्वक तपासा:

कोणतीही URL काळजीपूर्वक पाहिली पाहिजे आणि त्याची विश्वासार्हता तपासली पाहिजे. URL “https://” ने सुरू होत असल्याची खात्री करा. वेब पत्त्यातील “s” हे सूचित करते की वेबपृष्ठ सिक्योर सॉकेट लेयर (SSL) क्रिप्टोग्राफिक प्रोटोकॉलसह सुरक्षित आहे. वेबसाइटवर यापैकी काहीही नसल्यास, ही साइट सुरक्षित नाही. हॅकर्स त्यांचा वापर करतात. फिशिंग ओळखण्याचा दुसरा मार्ग म्हणजे त स्पेलिंग चूक पकडणे. फिशिंग वेबसाइट्समध्ये सामान्यतः खराब वाक्य निर्मिती आणि भाषा असते. तसेच, लिंकवर क्लिक करून किंवा संलग्नक उघडून कोणत्याही प्रकारच्या पुरस्कारांचा दावा करणाऱ्या ईमेलपासून सावध रहा. हे फिशिंग ईमेल असू शकते.

वाचा: मस्तच ! २० हजार रुपयांपर्यंतचा फायदा, Samsung, Xiaomi, Realme सह ‘या’ फोन्सवर मिळतोय बंपर ऑफ

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *