Headlines

कर्णधार रोहितला मिळालाय शमी-बुमराहपेक्षा घातक बॉलर

[ad_1]

मुंबई : टीम इंडियाने श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला आहे. टी 20 आणि कसोटीमध्ये एकहाती विजय मिळवला आहे. दुसरा कसोटी सामना 238 धावांनी टीम इंडियाने जिंकला. टी 20 मध्ये 3-0 ने विजय मिळवला आहे. या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या हाती खतरनाक बॉलर लागला आहे. कसोटी सीरिजमध्ये शमी आणि बुमराहसोबत तोही दमदार कामगिरी करताना दिसत आहे. 

स्पिनर महारथी आर अश्विन हा श्रीलंकेच्या टीमला पुरून उरला. जडेजा आणि अश्विननं दमदार कामगिरी केली. त्याने कसोटी सीरिजमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याच्या नावावर 12 विकेट्स आहेत. त्याखालोखाल 10 विकेट्स आहेत. 

रोहितला मिळाला शमी-बुमराहपेक्षा घातक बॉलर
 आर अश्विननं कसोटी सामन्यात सर्वात जास्त विकेट्स घेतल्या आहेत. घरच्या मैदानावर आर अश्विनच्या तावडीमधून वाचणं कठीणं आहे. आर अश्विनच्या नावावर 442 विकेट्सचा रेकॉर्ड आहे. कसोटीमध्ये 30 वेळा 5 विकेट्स एका डावात घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. 7 वेळा 10 पेक्षा जास्त विकेट्स सीरिजमध्ये त्याच्या नावावर आहेत. 

श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात आर अश्विननं 12 विकेट्स घेतल्या आहेत. टीम इंडियाने टी 20 पाठोपाठ आता कसोटी सामन्यात 2-0 ने विजय मिळवला आहे. श्रीलंकेचे खेळाडू आर अश्विनला खूप जास्त घाबरतात. आता तर अश्विनने त्यांची दांडी गुल केली आहे. 

आर अश्विननं आपल्या कामगिरीनं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याच्या कामगिरीची जगभरात चर्चा होत आहे. टीम इंडियासाठी आर अश्विन मॅच विनर ठरू शकतो. त्यामुळे शमी आणि बुमराहसोबत आर अश्विननं आपली टीम इंडियातील जागा पक्की केली आहे. 

रविचंद्रन अश्विन भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. रविचंद्रन अश्विनने 86 कसोटी सामन्यात 442 विकेट घेतल्या आहेत.  रविचंद्रन अश्विनची कसोटी क्रिकेटमध्ये 5 शतके आहेत आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या 124 आहे. रविचंद्रन अश्विनने 113 एकदिवसीय सामन्यांमध्ये 151 विकेट्स आणि 51 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 61 विकेट्स घेतले आहेत. 

रविचंद्रन अश्विनने एकदिवसीय सामन्यांमध्ये 707 धावा आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 123 धावा केल्या आहेत. 167 आयपीएल सामन्यांमध्ये रविचंद्रन अश्विनने 145 विकेट घेतल्या आहेत आणि 456 धावा केल्या आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *