कॅप्टन म्हणून असा निरोप मोजक्याच जणांना मिळाला….त्या पैकी एक धोनी!


मुंबई : आयपीएलपूर्वी सर्वात मोठी अपडेट आहे. चेन्नई संघात नाराजी आहे. महेंद्रसिंह धोनीनं आपलं कर्णधारपद सोडलं. CSK संघाच्या कर्णधारपदाची कमान रॉकस्टार जडेजाच्या खांद्यावर दिली आहे. कर्णधारपद सोडण्याच्या धोनीच्या निर्णयानं चेन्नई संघात नाराजी आहे. 

धोनीनं IPL मध्ये कर्णधार म्हणून एक तप पूर्ण केलं. टीम इंडियाचाच नाही तर चेन्नईचाही तो एक यशस्वी कर्णधार ठरला. चेन्नई संघाला त्याने आजपर्यंत 4 वेळा आयपीएलची ट्रॉफी मिळवून दिली आहे. 

2021 रोजी चेन्नई संघाला त्याने कर्णधार म्हणून शेवटचं जिंकवून दिलं. आता यंदा पंधराव्या हंगामाची जबाबदारी जडेजावर असणार आहे. महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ काहीसा भावुक करणारा आहे. 

महेंद्रसिंह धोनी IPL 2021 च्या विजयाची ट्रॉफी जिंकल्यानंतर ती हातात घेऊन आपल्या टीमकडे जातो. त्यानंतर तिथे टीमसोबत सेलिब्रेशन करतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धोनी आयपीएलमधील कर्णधारपद सोडणार अशी चर्चा त्यानंतर होती. पण अखेर तो क्षण आज आला. 

धोनीला असा निरोप कोणीच दिला नसावा. त्याच्या या निर्णयानं सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. धोनीच्या खास आठवणी चाहते सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

काही फॅन्सनी धोनीचे खूप आभार मानले आहेत. तर काहींनी धोनीची ही सुंदर आठवण त्याने चेन्नईला ट्रॉफी मिळवून दिल्यावर हा निर्णय घेतला असं म्हटलं आहे. चाहते देखील हा व्हिडीओ शेअर करत भावुक झाले आहेत. धोनी यंदा शेवटचं आयपीएल खेळणार असल्याचीही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. मात्र याबाबत अद्याप कोणीच अधिकृत माहिती दिली नाही. Source link

Leave a Reply