“कॅन्टीन कर्मचाऱ्याने बाथरूमच्या खिडकीतून…” आयआयटी बॉम्बेमधील विद्यार्थिनीचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल | canteen worker record obscene video in hostel bathroom iit bombay rmm 97 | Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News
“कॅन्टीन कर्मचाऱ्याने बाथरूमच्या खिडकीतून…” आयआयटी बॉम्बेमधील विद्यार्थिनीचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल | canteen worker record obscene video in hostel bathroom iit bombay rmm 97 | Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

“कॅन्टीन कर्मचाऱ्याने बाथरूमच्या खिडकीतून…” आयआयटी बॉम्बेमधील विद्यार्थिनीचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल | canteen worker record obscene video in hostel bathroom iit bombay rmm 97चंदीगड विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींचा आक्षेपार्ह व्हिडीओ लीक झाल्याने देशभरात पडसाद उमटले आहेत. हे प्रकरण ताजं असताना आता आयआयटी बॉम्बेमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील खाणावळीत काम करणाऱ्या एका कामगारानं विद्यार्थिनीचा बाथरूममध्ये छुप्या पद्धतीने व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

रविवारी रात्री आयआयटी बॉम्बेच्या एका विद्यार्थिनीने पवई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. आयआयटी बॉम्बेमधील एका कॅन्टीन कर्मचाऱ्याने हॉस्टेल क्रमांक १० (एच१०) मधील बाथरूममध्ये तक्रारदार विद्यार्थिनीचा गुप्तपणे व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कलम ३५४ (क) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा- “आरोपी मुलीने इतर मुलींचेही…” चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे व्हिडीओ लीक प्रकरणात वकिलाची कबुली

पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत म्हणाले, “कॅन्टीन कर्मचाऱ्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३५४ (क) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर रविवारी रात्री आरोपीला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आलं आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.”

हेही वाचा- विश्लेषण : आक्षेपार्ह व्हिडिओ लीक झाल्यास तुमचे कायदेशीर अधिकार काय आहेत?

‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, घटनेच्या दिवशी तक्रारदार तरुणी स्वच्छतागृहात गेली होती. यावेळी स्वच्छतागृहाच्या खिडकीतून कुणीतरी तिचं रेकॉर्डिंग करत असल्याचं तिला दिसलं. या प्रकारानंतर तिने आरडाओरडा केला. तसेच तातडीने वसतिगृह प्रशासनाकडे तक्रार केली. यानंतर आयआयटी बॉम्बेच्या वसतिगृह प्रशासनाने कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे फोन तपासले आहेत. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास केला जात आहे.Source link

AbsNews Team

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Recent Posts

Astrology Tips : शनिवारी चुकूनही ‘ही’ कामे करु नका, नाहीतर तुम्हाला अडचणींना…

Shani Dev Astrology Expert tips : शनिवार (Saturday) हा शनिदेवाचा (Shani Dev) दिवस आहे. शनिवारी…

35 mins ago

Squid Game फेम अभिनेत्यावर वयाच्या 78 व्या वर्षी लैंगिक छळाचा आरोप

Squid Game : 'स्क्विड गेम' (Squid Game) ही दक्षिण कोरियाई (South Korea) मालिका आहे. ही…

1 hour ago

हृतिकच्या बहिणीला Kartik Aaryan करतोय डेट? अभिनेत्याकडून मोठा खुलासा

Kartik Aaryan on Relationship : झगमगत्या विश्वात आपल्या नावाचा ठसा उमटवण्यासाठी अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik…

2 hours ago

DigiLocker मध्ये PAN-Aadhar-DL करा सेव्ह, नेहमी सोबत कॅरी करण्याची नाही पडणार गरज

नवी दिल्ली:DigiLocker App: डिजीलॉकरच्या मदतीने तुम्ही सगळे महत्वाचे डॉक्युमेंट्स कायम सोबत बाळगू शकता, ते सुद्धा…

3 hours ago

Love Marriage Upay: प्रेमविवाहासाठी आजपासूनच करा हा उपाय, फळ मिळण्यास लागणार नाही वेळ

Love Marriage Tips: अनेकांचे स्वप्न असते प्रेमविवाह झाला पाहिजे. मात्र, काहींच्याबाबत तो योग नसतो. परंतु…

5 hours ago

Panchang, 26 November 2022 : पंचांगानुसार आजचे शुभ अशुभ मुहूर्त..

Panchang, 26 November 2022:  आज आहे शनिवार. आजच्या पंचांगानुसार जाणून घ्या शुभ कार्य करण्यासाठी कोणती…

6 hours ago