Cannes वरून परतणाऱ्या ऐश्वर्याकडे पाहून नेटिझन्सना खात्री पटली, ‘ही तर गरोदर’


मुंबई : कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, पती आणि मुलीसह भारतात परतली. अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या विमानतळावर दिसले. यावेळी माध्यमांच्या अनेक प्रतिनिधींनी या सेलिब्रिटी कुटुंबाचे फोटो टिपले. (Aishwarya rai )

तिघांनीही हसऱ्या चेहऱ्यानं फोटोसाठी पोझ केली आणि काही क्षणांतच ते पुढे निघाले. तिथे कान्समधील ऐश्वर्याच्या लूकची चर्चा सुरु असतानाच ती परतली त्या क्षणी तिनं घातलेल्या कपड्यांनी विशेष नजरा वळवल्या. 

यावेळी ऐश्वर्यानं फुलाफुलांची नक्षी असणारं एक जॅकेट घातलं होतं. या जॅकेटनं ती सतत तिचा पोटाचा भाग लपवताना दिसली. आता ती असं का करत होती हे ठाऊक नाही, पण हेरणाऱ्यांनी तिची हीच बाब हेरली आणि मग काय… ? चर्चा सुरु झाल्या ऐश्वर्याच्या गरोदरपणाच्या. 

काहींनी तिच्या या लूकची प्रशंसा केली, तर काहींनी ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याचं म्हटलं. ऐश्वर्याच्या गरोदरपणाची अफवा उठण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ती गरोदर असल्याच्या बऱ्याच चर्चांनी जोर धरला होता. पण, या अफवा मात्र फार कार टिकल्या नाहीत. 

नेटिजन्स को लगता है कि ऐश्वर्या राय बच्चन प्रेग्नेंट हैं!

ऐश्वर्या-अभिषेक हुए थे आउटफिट्स के चलते ट्रोल

ऐश्वर्या सध्या चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरीही ती विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं कायमच चात्यांच्या भेटीला येत असते. कान्सदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत तिनं आपण मागील काही वर्षे रुपेरी पडद्यावर सक्रिय नसल्याचं म्हटलं होतं. 

वास्तवाला स्वीकृती देत आयुष्य जगण्याकडेच कायम आपला कल असल्याचं ऐश्वर्या कायम सांगताना दिसते. तिच्याकडे आगामी चित्रपटांची रांग लागलेली नसतानाही आहे त्यातच आनंदा राहण्यावर ती सध्या लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे. Source link

Leave a Reply