Cannes च्या रेड कार्पेटवर अचानकच दीपिकाला Ex Boyfriend नं गाठलं आणि मग….


मुंबई : हिंदी चित्रपट वर्तुळात पदार्पण केल्या क्षणापासूनच दीपिका पदुकोण हिच्या नावाची चर्चा गाजली. पाहता पाहता दीपिकानं या चित्रपट वर्तुळामध्ये तिचं भक्कम स्थान निर्माण केलं आणि मोठमोठे प्रोजेक्ट आपल्या नावी केले. दीपिकाची कारकिर्द इथं दिमाखात सुरु असतानाच काही वादळं आली आणि तिच्या आयुष्यात असणारी प्रेमाची साथ कायमची दुरावली. (deepika padukone at cannes)

अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका हे दोघंही त्यांच्या पदार्पणापासूनच चर्चेत राहिले. रिलेशनशिपमध्ये असल्यामुळं त्यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा सतत नजरा वळवत राहिली. 

नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. कारण, हे नातं फार काळ टिकलं नाही. नात्यात दुरावा आला असला तरीही दीपिकाकाच्या भूतकाळानं काही तिचा पाठलाग सोडला नाही. 

ती ज्या ठिकाणी जाईल, तिथं हा भूतकाळ तिच्यासोबतच जात होता. किंबहुना आजही असंच चित्र पाहायला मिळत आहे. कान्स चित्रपट महोत्सवासाठी गेलेल्या दीपिकानं तिच्या स्टायलिश लूकनं जगभरातील फॅशनिस्तांना घायाळ केलं. 

पण, भारतीयांनी मात्र इथं वेगळीच बाब हेरली. ही बाब म्हणजे दीपिकाचा भूतकाळ. Cannes च्या रेड कार्पेटवरही तिच्या या भूतकाळानं, अर्थात तिच्या Ex Boyfriend नं नकळतच लावलेली हजेरी. (Deepika Padukone and Ranbir Kapoor)

ही हजेरी होती म्हणजे, दीपिकाच्या मानेच्या मागच्या भागावर असणारा एक टॅट्टू. दीपिकानं रणबीरसोबत रिलेशनशिपमध्ये असताना तिच्या मानावर RK ही आद्याक्षरं असणारा एक टॅट्टू गोंदवून घेतला होता. 

लग्नानंतर तिचा हा टॅट्टू दिसेनासा झाल्याचं लक्षात आलं. पण, यावेळी कान्समध्ये मात्र दीपिकानं तिसा साडी लूक फ्लाँट केला आणि तिथे त्याचवेळी तिच्या मानेवर या टॅट्टूचा काही भाग पुसटसा दिसला. 

बस्स, मग काय… कान्सच्या रेड कार्पेटवरून हा फोटो थेट भारतात पाहिला गेला आणि इथं दीपिका- रणबीरच्या रिलेशनशिपनं सर्वांनाच चर्चेसाठी एक नवा विषय दिला. Source link

Leave a Reply