Call Recording : Android मध्ये कॉल रेकॉर्डिंग बंद झाले असले तरीही ‘या’ पद्धतीने करता येतील कॉल रेकॉर्ड, पाहा डिटेल्स


नवी दिल्ली: Call Recording :Google ने नुकतेच थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग अॅप्सवर बंदी घातली आहे. Google च्या नवीन धोरणानंतर तुम्ही कोणत्याही थर्ड पार्टीचा वापर करून कॉल रेकॉर्ड करू शकणार नाही. पण, अजूनही बरेच मार्ग आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही कॉल सहजपणे रेकॉर्ड करू शकाल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पद्धतींबद्दल सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही सहजपणे कॉल रेकॉर्डिंग करू शकता. Oppo, Vivo आणि Xiaomi फोनमध्ये इंटरनल कॉल रेकॉर्डिंगचा पर्याय आहे. पण, हे कॉल रेकॉर्डिंग तुम्हाला स्वतःला चालू करावे लागेल. हे ऑटो कॉल थर्ड पार्टी अॅप्सप्रमाणे रेकॉर्ड केले जात नाहीत.

वाचा: WhatsApp Features: एकच नंबर ! आता ३२ जण करू शकणार WhatsApp ग्रुप कॉलिंग, येतंय नवीन फीचर

Xiaomi च्या फोनमध्ये तुम्हाला कॉल केल्यानंतर, तुम्हाला तळाशी रेकॉर्डचा पर्याय दिसेल. हा पर्याय एनेबल केल्यानंतर, कोणताही कॉल रेकॉर्ड केला जाऊ शकतो. तर, Oppo सोबत असे होत नाही. Oppo मध्ये कॉल केल्यानंतर दुसऱ्या पेजवर रेकॉर्डचा पर्याय येतो. तर, Xiaomi Smartphones वर रेकॉर्ड पर्याय आधीच पेजवर दिसतो . Oppo प्रमाणे, Vivo वर रेकॉर्ड पर्याय देखील दुसऱ्या पेजवर येतो. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे हा फोन असेल तर तुम्ही तो सहज रेकॉर्ड करू शकता.

OnePlus वर देखील होते रेकॉर्डिंग :

OnePlus च्या नवीन युजर्सना मोबाईल फोनमध्ये Google Phone App मिळेल. या अॅप्समध्ये ऑटो कॉल रेकॉर्ड फंक्शन देखील आहे. मात्र, आता वन प्लसने ते बंद केले आहे. तुम्हाला हा पर्याय One Plus च्या जुन्या मोबाईल फोनमध्ये मिळेल. नवीन युजर्स प्ले स्टोअरवरून Google फोन अॅप डाउनलोड करावे लागेल. येथे तुम्हाला वर Three Dots दिसतील. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ‘ऑटो कॉल रेकॉर्ड’ वर क्लिक करावे लागेल. ते चालू केल्यानंतर, तुम्ही कोणताही कॉल सहजपणे रेकॉर्ड करू शकता.

वाचा: iPhone Offers: आयफोन खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण ! iPhone SE, 12 सह ‘या’ मॉडेल्सवर जबरदस्त ऑफर, पाहा डिटेल्स

वाचा: Smartphone Offers: फ्लिपकार्टवर Moto Days चा धमाका, भन्नाट ऑफर्ससह मिळताहेत ‘हे’ स्मार्टफोन्स, सर्वात स्वस्त ९,९९९ रुपयांचा

वाचा: Mobile Data: मोबाईल इंटरनेट खूपच लवकर संपत असेल तर, बदला ‘ही’ Setting, खूप चालेल डेटा, पाहा प्रोसेस

Source link

Leave a Reply