Headlines

मंत्रीमडळ विस्तार कधी होणार? चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं, म्हणाले… | chandrakant patil comment on eknath shinde cabinet expansion

[ad_1]

राज्याला एकनाथ शिंदे यांच्या रुपात मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रुपात उपमुख्यमंत्री मिळाले असले तरी शिंदे- भाजपा सरकारचे मंत्रीमंडळ अद्याप जाहीर झालेले नाही. शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळात कोणाला स्थान मिळणार तसेच भाजपाला कोणती खाती मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. याच मंत्रीमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत आहेत. असे असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >>> राज ठाकरे-फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळेंचा टोला; म्हणाल्या “एक आमदार असणाऱ्याकडे १०५ आमदार असणारा…”

“मंत्रीमंडळ विस्ताराबद्दल मला काहीही माहिती नाही. मंत्रीमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा असतो. दिल्लीशी बोलून ते याबाबत निर्णय घेतील,” असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. याबाबतचे वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे. पाटील यांनी मंत्रीमंडळ विस्ताराला कधी मुहूर्त लागणार, हे स्पष्टपणे सांगितलेले नाही. मात्र शिवसेनेतील १६ बंडखोर आमदारांच्या निलंबनाच्या मागणीवर न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरच त्यावर निर्णय घेतला जाईल, असे म्हटले जात आहे.

हेही वाचा >>> “गरज पडली तर शरद पवारांच्या घरी जाऊन…”, दीपक केसरकरांचा ‘त्या’ वक्तव्यावर खुलासा!

दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार हे स्पष्ट नसल्यामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जात आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार कधी करायचा, हा अधिकार राज्याच्या प्रमुखाचा असतो. सर्व विभागांना मंत्री आणि राज्यमंत्री नेमले गेले तर काम लवकर होते. सचिवांना, अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात. बैठका सुरु होतात, आढावा घेता येतो. या माध्यमातून अडचणी दूर करता येतात, असे अजित पवार काल (१४ जुलै) म्हणाले होते.

हेही वाचा >>> Mohammed Zubair : अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना जामीन मंजूर

तसेच, “सध्या सगळा भार या दोघांच्याच खांद्यावर आहे. यामागचे गमक काय याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सांगू शकतील. १६५ आमदारांचं पाठबळ विश्वासदर्शक ठरावात मिळाले असताना मंत्रीमंडळ विस्तार करण्यासाठी ते का घाबरत आहेत? त्यांना कोणी थांबवलं आहे? घोडं कोठे पेंड खात आहे?” असे प्रश्न त्यांनी सत्ताधाऱ्यांना केले होते..



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *