Headlines

बुलबुलचा ‘या’ कारणामुळे जडला अरुण लालवर जीव, स्वत: सांगितली Lovestory

[ad_1]

मुंबई :  टीम इंडियाचे माजी खेळाडू अरुण लाल (Arun Lal) वयाच्या 66 व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले आहेत. अरुण लाल यांनी त्यांच्यापेक्षा वयाने 38 वर्ष लहान असलेल्या बुलबुल साहासोबत सोमवारी म्हणजे 2 मे रोजी लग्न केलं आहे. लाल यांनी कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये हे लग्न केलं. अरुण लाल आणि बुलबुलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये हे दोन्ही कपल एकमेकांना किस करताना दिसत आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अरुण लाला आणि बुलबुलमध्ये 28 वर्षांचा फरक आहे, जो सध्या चर्चेचा विषय आहे. परंतु यांचं प्रेम कधी सुरु झालं आणि कसं सुरु झालं याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. चला तर या दोघांच्या लव्ह स्टोरीबद्दल जाणून घेऊ या.

एका मुलाखतीत बुलबुलने त्यांच्या प्रेमकथेबद्दल सांगितले आहे. तिने अरुणसोबतच्या तिच्या पहिल्या भेटीबद्दलही सांगितले आहे, ज्यामुळे दोघेही प्रेमात पडले होते. त्याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.

अरुणची दुसरी बायको बुलबुल साहा ही व्यवसायाने शाळेतील शिक्षिका आहे, जी जवळपास 8 वर्षांपासून कोलकाता येथील एका खाजगी शाळेशी संबंधित आहे. दोघेही काही काळ डेट करत होते, ज्यानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अरुण लाल यांच्या पहिल्या बायकोनेच त्यांना बुलबुलसोबत लग्न करण्याची परवानगी दिली.

आपल्या पहिल्या भेटीची सांगताना बुलबुल म्हणाली, “आम्ही दोघे एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून भेटलो. आम्ही एका पार्टीला गेलो जिथे आम्ही एकमेकांशी नेहमीप्रमाणे बोलू लागलो. मात्र, त्यानंतर आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो हे आम्हालाही कळलं नाही.

बुलबुल अरुणच्या प्रेमात का पडली?

या प्रश्नावर बुलबुलने एक छोटासा किस्सा सांगत बुलबुल म्हणाले, “हे पहिल्या नजरेत प्रेम नव्हते, पण आम्ही खूप लवकर प्रेमात पडलो. अरुण हा अतिशय जीवंत माणूस आहे आणि त्याला निसर्ग, प्राणी आणि गरीब लोकांवर खूप प्रेम आहे. आम्ही कुठेतरी बाहेर गेलो की, तो भिकारी दिसला की, त्यांना पैसे देतो. त्याच्याकडे पैसे नसतील तर तो माझ्याकडून पैसे घेतो.”

बुलबुल पुढे म्हणाली, “अरुण एक दयाळू माणूस आहे आणि तो निसर्गाच्या खूप जवळ आहे. हे कोणालाच माहीत नाही, परंतु त्यांनी जवळपास 5 हजार झाडे लावली आहेत.” बुलबुल पुढे म्हणाली, “आमच्याकडे शेती आहे आणि आता आम्हाला मातृभूमीसाठी काहीतरी करायचे आहे. हे फार्म रायपूर बुरुल दक्षिण 24 परगना येथे आहे. ते गंगेजवळ असल्याने आम्ही त्याचे नाव ‘पापा’ ठेवले आहे आणि आम्ही त्याला ‘वडिलांची मालमत्ता’ मानतो.

अरुणच्या या सर्व गोष्टींनी मला त्याच्याकडे आकर्षित केले आणि मी हळूहळू त्यांच्या प्रेमात पडले.

अरुण लाल हे 1982 ते 1989 या काळात भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू राहिले आहेत. 1979 मध्ये अरुण लाल कोलकाताहून दिल्लीत आले आणि त्यांनी स्वतःची क्रिकेट अकादमी सुरू केली. मात्र, 1981 मध्ये क्रिकेटपटू पुन्हा बंगालला गेला आणि बंगालच्या संघात सामील झाला. सध्या अरुण बंगाल संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. 2016 मध्ये त्याला जबड्याचा कॅन्सर झाल्याचेही निदान झाले होते, त्यानंतर त्याने समालोचनापासून स्वतःला दूर केले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *