इमारती नमुना नकाशे संकल्प चित्र स्पर्धेच्या वेबपोर्टलचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन – महासंवाद


सातारा, दि.26 (जिमाका) : जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून बांधण्यात येणाऱ्या इमारती नमुना नकाशे संकल्प चित्र स्पर्धेच्या  वेब पोर्टलचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृहात करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, अधीक्षक अभियंता संजय मुनगीलवार, कार्यकारी अभियंता शंकर दराडे, संजय सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व इंडीयन इनस्टिट्युट ऑफ आर्किटेक्टचे सुहास तळेकर व प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, नकाशे संकल्प चित्र स्पर्धेच्या पहिल्या तीन क्रमांकांना पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच यातील उत्कृष्ट नकाशाची निवड करुन जिल्हा नियोजन समिती, सातारा यांच्या निधीमधून जिल्हा परिषद, सातारा यांच्यामार्फत हाती घेण्यात येणाऱ्या इमारत बांधकाम जसे शाळा इमारत बांधकाम, अंगणवाडी बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रे, पशुसंवर्धन दवाखाना इमारतींचे बांधकाम करण्यात येणार आहे. हे काम करत असताना मंजूर तरतुदीमध्येच  करण्यात यावीत.   या कामांमध्ये कुठेही उणिवा राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील शासकीय इमारतींचे काम आकर्षक होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शासकीय इमारतींचे काम करीत असताना   मंजुर असलेल्या तरतुदीमध्ये काम करावे लागते. त्यामुळे आकर्षकपणा येईलच असे नाही. यासाठी शासकीय इमारतींचे काम आकर्षक व्हावे यासाठी नुकतीच बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली होती. यापुढे होणाऱ्या शासकीय इमारती आकर्षक सर्व सोयींयुक्त होण्यासाठी या स्पर्धेचा उपयोग होईल, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.

नमुना नकाशे संकल्प चित्र स्पर्धेमुळे जिल्ह्यातील शासकीय इमारतींचे काम आकर्षक होणार आहे. शासकीय इमारतींकडे नागरिकांचा बघण्याचा दृष्टीकोण चांगला नसतो. यासाठी नकाशे संकल्प चित्र स्पर्धा ही  पालकमंत्री व जिल्हाधिकारी

यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या स्पर्धेतील पहिल्या तिन क्रमांकाच्या नमुना नकाशे निवड करुन इमारतींचे काम केले जाईल. भविष्यात जिल्ह्यात चांगल्या व आकर्षक शासकीय इमारती उभ्या राहतील, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी व्यक्त केला.

ही स्पर्धा इंडियन इनस्टिट्युट ऑफ आर्किटेक्ट, सातारा शाखेतर्फे घेण्यात येणार असून स्पर्धेचा पूर्ण खर्च (बक्षीस रक्कम वगळता) संस्था करणार आहे. ही स्पर्धा माहे फेब्रुवारी 2022 मध्ये वेब पोर्टलद्वारे घेतली जाणार आहे. या स्पर्धेकरिता नामांकने 28 जानेवारी 2022 पासून स्विकृत केली जाणार आहे.  स्पर्धेत सहभाग घेण्याचा 10 फेब्रुवारी 2022 हा अंतिम दिनांक आहे

0000

Source link

Leave a Reply