Headlines

बडतर्फ पोलीस आरोपी अनिल लाड यांची चौकशी; अनिकेत कोथळे खुन प्रकरण

[ad_1]

सांगली : बडतर्फ पोलीस अनिल लाड याच्या चौकशीतून अनिकेत कोथळे याच्या खूनाचा उलघडा झाल्याचे तत्कालिन उपअधिक्षक धीरज पाटील यांनी न्यायालयात सरतपासावेळी सोमवारी सांगितले. पोलीस कोठडीत पोलीसांच्या मारहाणीमुळे कोथळेचा मृत्यू झाल्या प्रकरणी तत्कालिन फौजदार युवराज कामटेसह सहा जणाविरुध्द आरोपपत्र सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या खटल्याची सुनावणी आज पुढे सुरु झाली.

हेही वाचा <<< बागेत खेळणाऱ्या शाळकरी मुलींशी अश्लील कृत्य; एकाच्या विरोधात गुन्हा दाखल

आज या खटल्यात तत्कालीन उपाधीक्षक पाटील यांची साक्ष झाली.कोथळे खून खटल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अनिल लाड यांची चौकशी केली. त्या चौकशी दरम्यान साऱ्या खुनाचा उलघडा झाला. तसेच घटनास्थळ आणि महादेवगड डोंगर येथे मृतदेह जाळलेले ठिकाणही दाखवल्याची महत्वपुर्ण साक्ष तत्कालीन पोलिस उपाधीक्षक धीरज पाटील यांनी आज न्यायालयासमोर नोंदवली. जिल्ह्या व सत्र  न्यायाधीश आर.के.मलाबादे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरतपास घेतला.

हेही वाचा <<< अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रावर कोयत्याने वार;  कर्वेनगर भागातील घटना

थर्ड डिग्रीचा अवलंब करून सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत ६ नोव्हेंबर २०१७ ला संशयित अनिकेत कोथळे याचा खून करण्यात आला. या घटनेने राज्याच्या पोलिस दलाला हादरा बसला होता. या खटल्यात सरकारची बाजू विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे मांडत आहेत. या खटल्यात बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, नसरुद्दीन मुल्ला, वाहनचालक राहुल शिंगटे आणि झीरो पोलिस झाकीर पट्टेवाले आदी संशयित आहेत. एक संशयित हवालदार अरुण टोणे याचा आजाराने कारागृहातच मृत्यू झालेला आहे. आजच्या सुनावणीत तत्कालीन उपाधीक्षक  पाटील यांनी साक्ष नोंदवली. ते म्हणाले,‘‘पोलिस अधीक्षकांच्या सुचनेनुसार निरीक्षक राजन माने यांच्याकडून तपास घेतला. त्यावेळी संशयित आरोपी अनिल लाड यास समक्ष हजर केले.

हेही वाचा <<< पुणे : कात्रज भागातील ‘चुहा गँग’विरूद्ध ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

गुन्ह्याविषयी विचारपुस करून पंचासमक्ष अटक केली. निरीक्षक राजन माने यांना उर्वरित आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. लाड यास गुन्ह्यासंदर्भात विश्‍वात घेवून माहिती घेतली. त्यावेळी त्याने कोथळे याचा मृतदेह चारचाकी (एमएच १० सीएल ८३२) मधून महादेवगड डोंगरात नेला. त्याठिकाणी मृतदेह जाळल्याचे सांगितले. त्यानुसार घटनास्थळी पंचसमक्ष पंचनामा करण्यात आला.’’ सरतपासादरम्यान सरकार पक्षाचे वकील आणि बचाव पक्षाचे वकील यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. साक्षीदार पाटील यांचा अ‍ॅड. निकम यांनी सरतपास घेतल्यावर बचाव पक्षाचे अ‍ॅड. विकास पाटील-शिरगावकर, अ‍ॅड. गिरीश तपकिरे, ॲड. प्रमोद सुतार यांनी उलट तपास सुरू केला. जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख, ‘सीआयडी’चे  तत्कालीन उपाधीक्षक मुकुंद कुलकर्णी, निरीक्षक मनोज बाबर यांनी सरकार पक्षास सहकार्य केले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *