‘ब्रालेस सीन’, तोही 80 च्या दशकात; ही तिच अभिनेत्री जिच्यामुळं कपूर पिता-पुत्रामध्ये जुंपलेली


मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत ‘शो मॅन’, अशी ओळख असणाऱ्या राज कपूर यांच्या नावाला 80 च्या दशकात चर्चेतं वलय मिळण्याचं कारण होतं ती म्हणजे एक अभिनेत्री. ही तिच अभिनेत्री आहे, जिनं त्या काळात ब्रालेस सीन देत धुमाकूळ घातला होता. चित्रपट बेतानं गाजलाही, पण तिच्या त्या एका सीनचीच जास्त चर्चा झाली. किंबहुना आजही तो सीन विविध कारणांनी चर्चेत येतो. ही अभिनेत्री म्हणजे मंदाकिनी. (Actress mandakini braless scene in ram teri ganga maili raj kapoor rajiv kapoor fight)

कुख्यात डॉन दाऊदशी असणारं नातं असो किंवा मग बोल्ड सीन असो, मंदाकिनी बऱ्याच कारणांनी चर्चेत राहिली. बॉलिवूडमध्ये तिची कारकिर्द फारशी मोठी नाही, ती अचानकच दिसेनाशी झाली आणि एकाएकी तिनं लग्न केल्याची माहितीही समोर आली. 

१९९५ मध्ये तिने बौद्ध संत कागीर रिनपोचे सोबत लग्न केले आणि सध्या ती मुंबईत तिबेटी हर्बल सेंटर चालवत आहे. तसेच मंदाकिनी लोकांना तिबेटी योगा शिकवते. मंदाकिनीने आता बौद्ध धर्म स्वीकारला.

मंदाकिनीमुळं राज कपूर आणि त्यांचा मुलगा राजीव कपूर यांच्यातही वादाची ठिणगी पडल्याचं म्हटलं जातं. ‘राम तेरी गंगा मैली’मध्ये राज कपूर यांनीच मंदाकिनीची निवड केली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानतंर तिच्याच नावाची चर्चा झाली. 

तिला चित्रपटांच्या ऑफरही आल्या. पण, कपूर यांचा मुलगा राजीव याच्या नावाचा उल्लेखही दिसत नव्हता. त्याला ही बाब खटकली आणि यावरून सेलिब्रिटी पिता पुत्रामध्ये वादंग निर्माण झालं. 

ही दरी मिटण्यासाठी बराच काळ लोटला. राजीवनं वडिलांकडे पाठ फिरवली, हा राग इतका होता की, वडिलांच्या निधनानंतरही ते दिसले नाहीत. काही वर्षांपूर्वी राजीव यांचंही निधन झालं. Source link

Leave a Reply