दोन मुलांचा पिता असलेल्या व्यक्तीसोबत करायचं होतं अभिनेत्रीला लग्न; वडिलांशीही केलं भांडण


Shabana Azmi and Javed Akhtar: प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांचे आपण सर्वच फॅन आहोत. सलीम-जावेद (Salim Javed) या नावानं सत्तरच्या दशकात अनेक उत्तमोत्तम चित्रपट या लेखक जोडीनं दिलं आहेत. आपल्या प्रोफेशनल लाईफबद्दल जावेद अख्तर लोकप्रिय आहेतच पण त्याचसोबत त्यांच्या पर्सनल लाईफबद्दलही ते चर्चेत असतात. (vetern actress sabana azmi who wanted to marry javed akhtar who was married and were having two children)

जावेद अख्तर यांच्या पत्नी शबाना आझमीही (Shabana Azmi) त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी लोकप्रिय आहेत. आज 8 सप्टेंबर रोजी 72 वर्षांच्या झाल्या. त्यांचा जन्म 1950 मध्ये हैदराबाद येथे झाला. शबाना यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. सुरुवातीपासूनच त्यांनी आपल्या घरात फिल्मी वातावरण पाहिलं. बॉलीवूडमध्ये शबाना आझमी यांनी स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

शबामा आझामी यांच्या आईही चांगल्या अभिनेत्री होत्या ज्यांचे अलीकडेच निधन झाले. सलाम बॉम्बे या चित्रपटात त्यांनी भुमिका केली होती. शबामा आझमी आणि स्मिता पाटील यांच्यात त्या काळात तडगी स्पर्धा होती पण त्याच बरोबर चाहतेही त्या दोघींच्या अभिनयाचे कौतुकही करायचे. शबामा आझमी यांना राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. 

शबाना जशा त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखल्या जात होत्या त्याचप्रमाणे त्या एका गोष्टीसाठी चर्चेत आल्या होत्या. ते म्हणजे त्यांना जावेद अख्तर यांच्याशी लग्न करायचे होते. ज्यासाठी त्यांनी आपल्या वडिलांशी मतभेद ठेवले होते. 

ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा जावेद अख्तर शबानाचे वडील कैफी आझमी यांच्याकडे शिकायला जायचे आणि हाच तो क्षण होता जेव्हा दोघांमधील जवळीक वाढली होती. त्यावेळी जावेद अख्तर हे विवाहित होते व त्यांना झोया आणि फरान ही दोन मुलं होती. 

जावेद आणि शबाना यांच्यात वाढत्या जवळीकीची माहिती हनी इराणी (जावेदची पत्नी) यांच्या कानावर पोहोचली तेव्हा दोघांमध्ये भांडणे सुरू झाली अशी माहिती कळते. घरातील रोजच्या भांडणांना कंटाळून एके दिवशी हनी इराणीने निर्णय घेतला आणि पती जावेद अख्तर यांना शबानाकडे जाण्याची परवानगी दिली, असेही सांगितले जाते. त्यानंतर जावेद यांनी हनी यांना घटस्फोट देऊन शबाना यांच्याशी लग्न केले.

मात्र, जावेद अख्तरसोबत लग्न करणे शबाना यांच्यासाठी सोपे नव्हते. आपल्या मुलीने विवाहित पुरुषाशी लग्न करावे असे त्यांच्या वडिलांना वाटत नव्हते. पण असे म्हटले जाते की शबाना आझमी जावेद अख्तरच्या प्रेमात इतक्या वेड्या झाल्या होत्या की तिने आपल्या वडिलांशी भांडून जावेद यांच्याशी लग्न करायचा हट्ट धरला. 

अखेर शबाना यांच्या वडिलांनी त्या दोघांच्या लग्नाला परवानगी दिली आणि 1984 साली त्यांनी लग्न केले.  Source link

Leave a Reply