Headlines

दोन मुलांचा बाप असणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याचं 8 अभिनेत्रींसोबत अफेअर

[ad_1]

मुंबई : बॉलिवूडमध्ये सर्वात चर्चेत असणारा विषय म्हणजे सेलिब्रिटींचे अफेअर…  झगमगत्या विश्वात कलाकार अनेक चांगल्या-वाईट गोष्टींचा सामना करत असतात… पण कायम चर्चेत राहण्याचा विषय म्हणजे सेलिब्रिटींचे रिलेशन… अभिनेता शाहीद कपूरने मीरा राजपूतसोबत लग्न केलं आहे. शाहीद आणि मीराला एक मुलगा आणि एक मुलगी आहे… पण मीरासोबत लग्न करण्यापूर्वी शाहीदचं 9 प्रसिद्ध अभिनेत्रींबद्दल असलेल्या नात्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत…

अभीनेत्री करीना कपूर 
2004 मध्ये सुरू झालेल्या शाहिद-करीनाची लव्हस्टोरीसुद्धा माध्यमांसाठी चर्चेचा विषय बनली होती. दोघांना बर्‍याचदा एकत्र स्पॉट केलं जात होतं. एवढंच नव्हे तर या दोघांनीही आपलं नात जाहीरपणे स्वीकारलं होतं. मात्र या दोघांच्या नात्यात तेव्हा दुरावा आला जेव्हा हे दोघंही ‘जब वी मेट’ या चित्रपटात काम करत होते.

अभिनेत्री ऋशिता भट्ट
बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवण्यापूर्वी शाहीद अभिनेत्री  ऋशिता भट्टला डेट करत होता. ‘आंखों में तेरा ही चेहरा’ गाण्यात दोघे एकत्र दिसले होते.. त्यांच्या नात्याची चर्चा देखील तुफान रंगली होती. 
 
अभिनेत्री अमृता राव
‘विवाह’ सिनेमात अमृता आणि शाहीदच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. तेव्हा दोघांच्या नात्याची चर्चा रंगली. पण दोघांनी कधी नात्याचा स्वीकार केला नाही.. त्यावेळी अमृताने शाहीद चांगला मित्र असल्याचं सांगितलं होतं. 

अभिनेत्री प्रियंका चोप्रा
करीना कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर शाहिद अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या जवळ आला. शाहिद आणि प्रियंकाने कधीही त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही. पण काही दिवसांनी त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या जोर धरू लागल्या. शाहिद आणि प्रियंकाच्या प्रेमाची सुरूवात झाली ती म्हणजे ‘कमीने’  चित्रपटाच्या माध्यमातून. 

अभिनेत्री बिपाशा बासू 
अभिनेत्री बिपशा बासू आणि शाहीद  ‘शिखर’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आला… शुटिंग दरम्यान त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली. अनेक वेळा दोघांना एकाचं ठिकाणी स्पॉट करण्यात आलं. 

अभिनेत्री नर्गिस फाखरी
शाहिदच्या ‘फटा पोस्टर निकला हिरो’ या सिनेमातील ‘धतिंग नाच’ या गाण्यात नर्गिसने आयटम साँग केलं होतं. इथून दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगू लागल्या. दोघे लिव्ह-इनमध्ये राहत असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.

अभिनेत्री विद्या बालन
शाहिद आणि विद्या ‘किस्मत कनेक्शन’ सिनेमात एकत्र दिसले होते. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या. रिपोर्टनुसार, विद्याच्या वजनावर टिप्पणी केल्यामुळे दोघांचं नाते तुटलं.

सानिया मिर्झा 
अभिनेता शाहीद कपूर आणि टेनिसपटू सानिया मिर्झाच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या. पण त्याचं नातं फार काळ काही टिकलं नाही.. मिळालेल्या माहितीनुसार, सानियाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत लग्न केलं आणि शाहीदसोबत असलेल्या नात्याला फक्त अफवा असल्याचं सांगितलं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *