बॉलिवूडमध्ये आणखी एका जोडप्यात वाद, विभक्त होण्यासाठी घेणार कायद्याची मदत


मुंबई : बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध सेलिब्रिटींनी विभक्त होण्याचा निर्णय घेत चाहत्यांना मोठा धक्का दिला. आता बॉलिवूडच्या आणखी एका सेलिब्रिटीचं नात तुटण्याची शक्यता आहे. अभिनेत्री सुष्मिता सेनचा भावाचं लग्नाचा शेवट होवू शकतो.  राजीव सेन (Rajeev Sen) आणि चारु असोपा (Charu Asopa) लवकरचं विभक्त होणार असल्याचं कळत आहे. महत्त्वाचं म्हणजे यावेळी दोघे कायद्याची मदत घेणार असल्याचं कळत आहे. 

ईटाईम्सच्या रिपोर्टनुसार, चारू असोपा आणि राजीव सेन यांच्या नात्यात मतभेद निर्माण झाले आहेत. या जोडप्याने आता कायदेशीर मार्ग पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, दोघांमध्ये लग्नापासूनच अडचणी सुरू होत्या.  वाद झाल्यानंतर दोघे अनेकदा एकत्र आल्याचं कळालं. 

चारु आणि राजीवमधील असलेले मतभेत दूर करण्याचा कुटुंबीय प्रयत्न करत होते, परंतु यावेळी त्यांचे प्रयत्नही अपयशी ठरत आहेत. म्हणून राजीव आणि चारु यांनी आपलं लग्न संपवण्याचा निर्णय घेतला असल्याचं समोर येत आहे. 

महत्त्वाचं म्हणजे चारुने राजीवसोबत असलेले सर्व फोटो सोशल मीडियावरुन हटवले आहेत. सध्या सर्वत्र चारु आणि राजीवच्या नात्याबद्दल चर्चा रंगत आहेत. 

चारु आणि राजीव यांना एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव झियाना असं आहे. चारु सोशल मीडियावर लेकीसोबत सतत फोटो शेअर करत असते. झियानाच्या जन्मानंतर काही महिन्यात चारु राजीवला सोडून माहेरी बिकानेरला निघून गेली. 

चारु असोपाने 7 जून 2019 रोजी सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनसोबत लग्न केलं. या दोघांना झियाना नावाची मुलगी आहे. चारू तिच्या मुली आणि पतीसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. 

यासोबतच चारू फेसबुकवर तिचा ब्लॉगही चालवते आणि छोट्या छोट्या गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करते. आता चारु आणि राजीवच्या आयुष्यात कोणत्या घटना घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. Source link

Leave a Reply