बॉलीवूड इंडस्ट्रीचं असं सिक्रेट्स, जाणून उडेल तुमची झोप


मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीचे असे अनेक गुपिते दडलेले आहेत, जे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच आतुर असतात. बॉलीवूड अशी इंडस्ट्री आहे, जेथे प्रत्येक कलाकाराचे असे एक तरी सिक्रेट आहे, जे सगळ्यांनाही माहित नसते. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील असेच काही सिक्रेट्स सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला विश्वासच बसणार नाही. चला जाणून घेऊया बॉलीवूडमधील टॉप सिक्रेट्स, ज्याबद्दल अनेकांना अजूनही माहिती नाही.

माधुरी आणि संजय दत्त

माधुरी आणि संजय दत्त यांनी अनेक चित्रपट एकत्र केली आहेत. खरंतर जेव्हा पत्नी रिचा शर्माला कॅन्सर झाला तेव्हा संजय दत्तला ड्रग्जचे व्यसन लागले होते. त्यावेळी माधुरी दीक्षितसोबत संजय दत्तच्या अफेअरचीही बरीच चर्चा झाली होती. त्यावेळी खरंतर माधुरी दीक्षितने संजू बाबाला त्याच्या व्यसनावर मात करण्यास मदत केल्याचेही बोलले जात आहे. याबद्दल फारच कमी लोकांना माहित आहे.

हरमन बावेजाकडून प्रियंका चोप्राची फसवणूक

प्रियंका चोप्रा आणि हरमन बावेजा अनेक वर्षांपूर्वी एकमेकांना डेट करत होते. या प्रकरणाची खूप चर्चा झाली होती. प्रियांका चोप्रासोबत रिलेशनशिपमध्ये असताना हरमन बावेजाने अभिनेत्रीची फसवणूक केल्याचे बोलले जात आहे.

एवढेच नाही तर प्रियांका चोप्राने स्वतः हरमन बावेजाला रंगेहात दुसऱ्या मुलीसोबक पकडले होते. त्यानंतर त्यांचे नाते तिथेच संपले.

संजय खानच्या पहिल्या पत्नीकडून दुसरी पत्नी झीनत अमानला मारहाण

बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज संजय खान यांनी त्यांची दुसरी पत्नी झीनत अमानचा शारीरिक आणि मानसिक छळ केला असल्याचे सांगितले जात आहे. अशीच एक घटना एका हॉटेलच्या लॉबीमध्ये अनेक पाहुण्यांच्या उपस्थितीत एका फिल्म पार्टीत घडली. त्या पार्टीत संजय खान आणि जरीनने झीनत यांना काही काम करायला सांगितलं होतं, परंतु ते काम न केल्याने  त्या दोघांनीही झीनत यांना मारहाण केली, ज्यामुळे झीनत यांच्या डोळ्यांजवळ गंभीर दुखापत झाली होती.

तसेच जरीन खानने झीनत यांच्यावर स्वत:चा पतीवर चोरी केल्याचा आरोप केला होता.

महेश भट्ट यांनी जीव धोक्यात घालून परवीन बाबीसोबत तोडले संबंध

बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि दिवंगत अभिनेत्री परवीन बाबी यांच्या अफेअरची संपूर्ण इंडस्ट्रीत चर्चा होती. त्यावेळी महेश भट्ट विवाहित होते आणि परवीनसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मात्र, हे नाते फार काळ टिकले नाही आणि दोघेही वेगळे झाले.

एकदा महेश भट्ट घरी आले तेव्हा परवीन बाबी चित्रपटाच्या आउटफिटमध्ये हातात चाकू घेऊन होती. तिने महेशवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यानंतर महेश भट्ट तिथून पळून गेले आणि त्यांनी परवीन बाबीपासून लांब राहण्याचे ठरवले आणि आपलं नातं देखील संपवलं.Source link

Leave a Reply