Headlines

Bollywood Gossip: ‘या’ अभिनेत्री लग्नाआधीच होत्या Pregnant, नावं वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

[ad_1]

Bollywood Actresses Gossip : बॉलिवूडमध्ये प्रत्येक महिलेला काम करण्याची इच्छा असते. काही महिलांच्या इच्छा पुर्ण होतात तर काही महिलांच्या इच्छा अपूर्ण राहतात. अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. आपल्याला बॉलिवूड जितकं सोपं वाटतं तितकं तिथे काम करणे सोपे नाही. अनेक वेगवेगळ्या अडचणींना पाठी घालत यशाची शिखरे पार पाडावी लागतात. बॉलिवूड एक अशी जागा आहे जिथे कधीही काहीही होऊ शकते. इथे अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लग्न न करताच आई झाल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींची नावे सांगणार आहोत ज्यांनी लग्नाशिवाय मुलांना जन्म दिला आणि आई बनल्या आहेत. (bollywood gossip actress was pregnant before marriage you will be shocked nz)

 
1. श्रीदेवी (Sridevi)

श्रीदेवी एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. त्यांनी 1996 मध्ये बोनी कपूरसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. असे मानले जाते की श्रीदेवी लग्नाच्या 7 महिन्यांपूर्वी गर्भवती होत्या. आणि त्यावेळी जान्हवी कपूर तिच्या पोटात वाढत होती.

2. नीना गुप्ता (Neena Gupta)

नीना गुप्ताही लग्नाशिवाय आई झाली आहे. हा प्रकार तेव्हा घडला जेव्हा नीना गुप्ता यांचे क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबत अफेअर सुरू होते. त्यावेळी नीना गुप्ता विवियनच्या मुलाची आई होणार होती. विवियन विवाहित होता म्हणून त्याने नीनाशी लग्न केले नाही. पण मुलीच्या संगोपनाचा सर्व खर्च भागवण्याची जबाबदारी घेतली. यानंतर आपल्याला एक प्रसिद्ध डिझायनर मसाबा गुप्ता (Masaba Gupta) मिळाली.

हे ही वाचा – एकेकाळी बॉलिवूड गाजवलं, आज ‘या’ स्टार्सवर आली इतकी वाईट वेळ

3. सारिका (sarika)

कमल हसन (kamal hasan) आणि सारिका यांची प्रेमकहाणी खूप जुनी आणि लोकप्रिय आहे. कमलचे आधीच लग्न झाले होते. आणि मग सारिका त्यांच्या आयुष्यात आली. दोघांमध्ये प्रेमाचा एवढा ताप चढला की सारिका गरोदर राहिली. यानंतर सारिकाला कमलचे घर फोडायचे असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र त्यानंतरही सारिकाने कमल हसन यांना सोडले नाही. नंतर कमल आणि सारिकाचे लग्न झाले. त्यानंतर कमल आणि सारिका यांना दोन मुली झाल्या. 

4. कोंकणा सेन (Konkona Sen Sharma)

कोकणा सेन ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. जेव्हा तिने रणबीर शौरीशी लग्न केले तेव्हा ती 1 ते 2 महिन्यांची गरोदर होती. लग्नानंतर लगेचच ती आई झाल्याची बातमी आली तेव्हा ही गोष्ट समोर आली. त्यावेळी या बातमीची खूप चर्चा झाली होती. 

हे ही वाचा – अभिनेत्री अभिनयाव्यतिरिक्त ‘या’ मार्गाने कमवतात कोट्यवधी रुपये, वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

5. नेहा धुपिया (Neha Dhupia)

नेहा धुपियाने अंगद बेदीसोबत (Angad Bedi) लग्न केले तेव्हा नेहा आधीच प्रेग्नंट होती. अंगदने स्वतः ही गोष्ट सांगितली. यासोबतच अंगदने असेही सांगितले की, या प्रकरणावरून आई-वडिलांसोबत खूप भांडण झाले होते.

6. ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna)

ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) हे आजच्या काळातील सर्वात आवडते जोडपे आहेत. ज्या वेळी ट्विंकल आणि अक्षयचे लग्न झाले होते. तेव्हा ट्विंकल खन्ना आधीच प्रेग्नंट होती. असे बातमीत सांगण्यात येत होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *