बॉलिवूड अभिनेत्याने बोल्डनेसची केली हद्द पार, फोटो पाहून व्हाल हैराण

[ad_1]

मुंबई : भारतीय सुपरमॉडेल अभिनेता मिलिंद सोमनने काही वर्षापुर्वी न्यूड फोटो शूट केले होते. बिचवर धावतानाचा त्याचा हा फोटो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण आतापर्यत अभिनेत्रींने न्यूड फोटो शूट केल्याच्या घटना एकल्या होत्या. मात्र आता एका अभिनेत्याने अशाप्रकारे न्यूड फोटो शूट केल्याने मोठी खळबळ माजली होती. मात्र आता मिलिंद सोमननंतर एका बॉलिवूड अभिनेत्याने बोल्ड फोटो शूट केले आहेत. हे फोटोशूट पाहून बॉलिवूड अभिनेत्री कमेंटवर कमेंट करतायत. 

बॉलिवूड अभिनेता राहुल खन्नाने याने बोल्ड फोटो शुट केले आहे. हे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.त्याचे हे फोटो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच त्याचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. 

फोटोत काय?
राहुल खन्नाने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने अंगावर कपडे घातलेले नाही आहेत. तो निळ्या सोफ्यावर आरामात बसलेला दिसत आहे.त्याने आपला प्रायव्हेट पार्ट उशीने झाकलाय. तर पायात शूज आणि मोजे नक्कीच घातले आहेत. हा फोटो पाहून सर्वंच शॉक झाले आहेत. 

या फोटाच्या कॅप्शनमध्य़े राहूल म्हणतो की, मी लपवून ठेवत आहे असे काहीतरी आहे, पण आता ती शेअर करण्याची वेळ आली आहे!, असे तो म्हणालाय. या पोस्टनंतर राहुल खन्ना उद्या म्हणजेच सोमवारी काहीतरी मोठा खुलासा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अभिनेत्रींच्या कमेंटस 
राहुल खन्नाचे हे फोटो पाहून मलायका अरोरा स्वतःला रोखू शकली नाही. आणि तिने सोफा चांगला असल्याची कमेंट केली आहे. नेहा धुपियाने मोजे चांगले असल्याची कमेंट केली आहे. राहुल खन्नाची ही बोल्ड स्टाईल लोकांना पसंत पडत आहे.

कोण आहे हा अभिनेता?
राहुल हा प्रसिद्ध अभिनेता विनोद खन्ना यांचा मोठा मुलगा आहे. त्यांचा जन्म मुंबईत झाला. राहुल खन्ना यांनी त्यांचे वडील आणि भावाप्रमाणे चित्रपटांमध्ये नशीब आजमावले. पण राहुलला भाऊ आणि वडिलांप्रमाणे चित्रपटसृष्टीत यश मिळवता आले नाही. त्यामुळे तो मॉडेलिंगकडे वळला होता. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *