Headlines

बॉलीवूड आता संपलं? खुद्द करण जोहरकडून मोठा खुलासा…

[ad_1]

Karan Johar : बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे आणि ते युद्ध आहे बॉक्स ऑफिसचं. हिंदी आणि साऊथ या दोघांपैकी कोण चांगला? यावर जोरदार चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर एकीकडे साऊथचे चित्रपट एकामागून एक हिट होत आहेत त्याचबरोबर बॉलीवूडचे चित्रपट सातत्याने फ्लॉप होत आहेत. 

यावर प्रचंड मोठी चर्चाही सिनेसृष्टीत सुरू झाली आहे तसेच असेही अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत की बॉलीवूड आता संपण्याच्या मार्गावर आहे का? अशीच परिस्थिती राहिली तर बॉलीवूड पुर्णपणे नष्ट होईल का? यावर भले भले प्रेक्षक प्रश्न उपस्थित करत आहेत.  

असाच एक प्रश्न बॉलीवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरलाही विचारण्यात आला आहे. यावर मात्र करण जोहर आपलं परखड मतं दिले असून त्याने ”आता बॉलीवूड संपणार का” हा प्रश्नालाही फेटाळून लावला आहे. तो म्हणाला की, ”प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचणे हे एक आव्हान असते पण बॉलीवूड संपलं आहे यावर माझा विश्वास नाही. ही चर्चाच मुळी व्यर्थ आहे”, असं त्याने सांगितले. 

बॉलीवूड संपलं?
जेव्हा करण जोहरला एका मुलाखतीत विचारण्यात आले की, ”बॉलिवूड संपले आहे का?” तेव्हा त्याने उत्तर दिले, “सध्या सर्वत्र वायफळ चर्चा सुरू आहे. मी तर म्हणेन की बकवासच सुरू आहे. चांगले चित्रपट नेहमीच चालतात. ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘भूल भुलैया 2’ यांनी मोठी कमाई केली. आमच्या ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटानेही चांगली कमाई केले. जर चित्रपटच चांगला नसेल तर तो कधीच चालू शकत नाही.” असे परखड मतं करन जोहरने व्यक्त केले. 

आमिर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान बॉलीवूडला जिवंत ठेवतात…
करण पुढे म्हणाला की, ”मला आशा आहे की आमिर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांचे आगामी चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुन्हा धमाका आणतील’. प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत खेचणे आता इतके सोपे राहिलेले नाही. तुमचा चित्रपट, ट्रेलर, प्रमोशन सर्वकाही चांगले आहे पण प्रेक्षक चित्रपटगृहांकडे खेचले जातील याची काही खात्री नाही.”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *