Headlines

लायन्स क्लब ऑफ बार्शीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

बार्शी / प्रतिनिधी – लायन्स क्लब ऑफ बार्शी च्या वतीने गेली 42 वर्षे सातत्याने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर घेतले जाते. यंदाच्या वर्षी करोणा काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य म्हणून लायन्स क्लबच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन बार्शी नगरपालिकेचे नगराध्यक्ष असिफ तांबोळी , विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, झोन चेअरमन नंदकुमार कल्याणी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी व्यासपीठावर व्यासपीठावर अध्यक्ष ॲड विकास जाधव, उपाध्यक्ष प्रशांतकाका पंडित,सचिव संतोष जोशी , खजिनदार अल्ताफ शेख,लायन्स क्लब बार्शी राॅयलचे अध्यक्ष गणेश भंडारी, लायन्स क्लब बार्शी चेतनाचे अध्यक्ष ईश्वरी जोशी, सचिव गायत्री बंडेवार, खजिनदार जयश्री कदम,रोटरी क्लबचे अध्यक्ष विक्रम सावळे, सरपंच परिषद जिल्हा समन्वयक शिवशंकर ढवण हे उपस्थित होते.

लायन्स क्लबच्या माध्यमातून घेतलेल्या शिबिरात रक्तदात्यानी उत्साहात रक्तदान केले.याप्रसंगी अक्षय बंडेवार ,बापूसाहेब कदम ,गिरीश शेटे ,अनिल देशपांडे ,गोवर्धनदास जाजू ,जयप्रकाश भराडिया ,गोविंद तापडिया, नितिन कौलवार ,डॉ केशवराज मुळे ,दिनेश श्रीश्रीमाळ ,महेंद्र कथले ,संदीप नागणे , सरपंच परिषद महिला कार्याध्यक्ष गोटे आंधळकर ,पांडुरंग घोलप ,विकास माने , कुलभूषण देशमुख, बाबासाहेब जाधव, अभिजित जाधव, किरण जाधव यांच्या सह पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *