Headlines

BJP mla gopichand padalkar criticized sharad pawar on maratha ews reservation spb 94

[ad_1]

मराठा समाजाला पूर्वलक्ष्यी प्रभावाने ईडब्लूएसचा लाभ देण्याचा निर्णय तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, हा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला. यावरून भाजापा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीकास्र सोडले. काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचं भले होऊ द्यायचं नाही, असं ते म्हणाले.

हेही वाचा – फडणवीस चुकीचे सांगताहेत, आम्ही पाच नव्हे सात मंत्री होतो! ; अजित पवार यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

“मराठा समाजाला पूर्वलक्ष्यी प्रभावाने ईडब्लूएसचा लाभ देण्याचा निर्णय तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, मी त्याचवेळी सांगितले होते. कायद्यामध्ये पूर्वलक्ष्यी प्रभावाने काही देता येत नाही. हा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर एक पुन्हा एकदा सिद्ध झाले. खरं तर काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचं भले होऊ द्यायचे नाही. गरीब मराठा समाजाचं भलं करण्यापेक्षा यांना आपल्याच माणसाचं भलं करण्यात रस आहे.”, अशी प्रतिक्रिया पडळकर यांनी दिली.

हेही वाचा – “५० खोकेवाले आता…”, राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

पुढे ते म्हणाले, “काका-पुतण्याचं दुखं हेच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही घराणेशाहीला संधी न देता एका साध्या मराठा कुटुंबातील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली. त्यामुळे त्यांच्या पोटात कळा उठत आहे. हीच त्यांची खरी वृत्ती आहे बाकी सर्व आपुलकीच्या भूलथापा आहेत.”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *