Headlines

बाळासाहेबांना अजून किती लहान कराल? उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावरून नितेश राणेंची टीका | BJP leader nitesh rane on uddhav thackeray interview sanjay raut saamana rmm 97

[ad_1]

शिवसेनेतील बंडखोरीनंतर आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाहीर मुलाखतीद्वारे पहिल्यांदाच व्यक्त झाले आहेत. या मुलाखतीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांसह भाजपावर जोरदार टीका केली असून अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ही मुलाखत ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली आहे.

“हिंमत असेल तर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो न वापरता सभा घेऊन दाखवा” असं आव्हान उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या माध्यमातून बंडखोर आमदारांना केलं आहे. यावरून आता भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. उद्धव ठाकरे तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना अजून किती लहान कराल? असा खोचक टोला राणे यांनी लगावला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा- “शिवसेनेचं नाव व चिन्ह गोठवून हिंदुत्ववादी मतं एका पेटीत आणण्याचा भाजपाचा डाव” पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान

उद्धव ठाकरेंच्या विधानाचा उल्लेख करत नितेश राणे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे माझे वडील आहेत, माझा बाप आहे, तुम्ही तुमच्या आई-वडिलांचे फोटो लावा. उद्धव ठाकरेंना अजून कळलंच नाही की, बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील असंख्य शिवसैनिकांचे आणि लोकांचे दैवत आहेत. आपल्याच वडिलांना, आपल्याच बाळासाहेबांना किती लहान करणार? हे अजूनपर्यंत उद्धव ठाकरेंना न कळाल्यामुळे हे दिवस आले आहेत. आपण छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आहिल्यादेवी होळकर यांना दैवत मानतो. आता त्यांच्या वंशजांनी पुढे येऊन बोलायला सुरुवात केली की, महाराजांचे, आंबेडकरांचे किंवा आहिल्यादेवी होळकरांचे फोटो लावू नका. तर अशा कृतीतून तुम्ही त्या-त्या महापुरुषांना लहान करत नाहीयेत का?” असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.

दरम्यान, आज सकाळी नितेश राणे यांनी या मुलाखतीमधील एक क्लिप शेअर करताना ‘मानलं तुम्हाला’ अशी कॅप्शन देत उद्धव ठाकरेंना उपहासात्मक टोला लगावला आहे. नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर आणि भाचे वरुण सरदेसाई यांचा संदर्भ देत टीका केलीय. “वाह! उद्धवसाहेब!! अखेर तुम्ही ‘पाटणकर’ आणि ‘सरकारी भाचा’ बद्दल स्पष्टच बोललात,” अशा कॅप्शनसहीत नितेश यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. या क्लिपमध्ये उद्धव ठाकरे हे, “तुझं तेही माझं, माझं तेही माझं. याचं तेही माझं. त्याचं तेही माझं. माझं ते माझं आणि तुझं ते माझं इथपर्यंत होतं आता याचंही माझं आणि त्याचंही माझं इथपर्यंत त्यांची हाव गेलेली आहे,” असं म्हणताना दिसत आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *