Headlines

bjp girish mahajan mocks shivsena uddhav thackeray chhagan bhujbal

[ad_1]

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला महाविकास आघाडीमधील अनेक महत्त्वाच्या नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या कार्यक्रमातील अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. मात्र, त्याहून जास्त चर्चा ही कार्यक्रमात नेतेमंडळींनी केलेल्या टोलेबाजीची झाली. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी यावेळी छगन भुजबळांविषयी केलेल्या वक्तव्यावरून भाजपा आमदार गिरीश महाजन यांनी खोचक टोला लगावला आहे.

छगन भुजबळ सोबत राहिले असते, तर त्यांनाच मुख्यमंत्री केलं असतं, अशा आशयाचं विधान उद्धव ठाकरेंनी या कार्यक्रमात बोलताना केलं. यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना गिरीश महाजन यांनी आज धुळ्यात पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंनाच हवं होतं, असं म्हणत गिरीश महाजन यांनी भुजबळांविषयी केलेल्या विधानाचा समाचार घेतला.”मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच व्हायचं होतं. मग कुणीही त्यांच्यासोबत असतं तरी. मग ते एकनाथ शिंदे असते किंवा भुजबळ असते तरी त्यांना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री केलं नसतं”, असं महाजन म्हणाले.

छगन भुजबळांच्या अमृत महोत्सवाला मुख्यमंत्री शिंदे-उपमुख्यमंत्री फडणवीस गैरहजर, अजित पवारांचा टोला, म्हणाले…

“भुजबळ बाळासाहेबांबद्दल काय बोलत होते…”

“छगन भुजबळ बाळासाहेबांबद्दल काय काय बोलत होते आणि शिवसेना भुजबळांबद्दल काय काय बोलत होती, हे आपण सगळ्यांनी ऐकलं आहे. मी तर भुजबळ फुटल्यापासून ३० वर्षं सोबतच आहे. यांची किती टोकाची भाषा होती? पण आज हे एकमेकांना गुदगुल्या करत आहेत की ‘तुला मुख्यमंत्री केलं असतं, याला केलं असतं, मी झालो असतो, तो झाला असता’. आता यांच्या गंमतीजमती बघायला मिळत आहेत”, असंही गिरीश महाजन यावेळी म्हणाले.

एकनाथ खडसेंच्या ‘त्या’ विधानावर प्रत्युत्तर!

दरम्यान, एकनाथ खडसेंनी भाजपाबाबत केलेल्या विधानावरही गिरीश महाजनांनी टीकास्र सोडलं. “भाजपा आता वाणी-ब्राह्मणांचा पक्ष न राहाता बहुजनांचा पक्ष झालाय”, अशा आशयाचं विधान एकनाथ खडसेंनी केलं होतं. त्यावरून महाजनांनी खडसेंना प्रत्युत्तर दिलं आहे.”बोलताना आपण लक्षात घ्यायला हवं की माणूस फक्त जातीवर समाजात मोठा होत नाही. तो त्याच्या अंगी असलेल्या गुणांमुळेही मोठा होतो. देवेंद्र फडणवीसांबाबत आख्खा देश सांगेल की हा माणूस किती कॅलिबरचा आहे. तुम्हाला खूप वाटतं की तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी होती. पण तुम्ही आत्मपरीक्षणही करायला हवं. तु्महाला जे वाटतं, ते लोकांनाही वाटलं पाहिजे. तुम्ही काय काय पराक्रम केले आहेत, ते सगळे समोर येत आहेत. अशी टीका-टिप्पणी करणं योग्य नाही. हा पक्ष जगातला सर्वात जास्त सदस्य असलेला पक्ष आहे.आता तुम्ही भाजपातून गेला आहात. आता तुम्ही एवढं वाटतंय तर राष्ट्रवादी काँग्रेस वाढवा”, असं महाजन म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *