Headlines

“भाजपा आणि शिवसेना ओरिजिनल म्हणजे शिंदे गट, आम्ही…”; अमित शाहांच्या ‘भुईसपाट करा’ विधानानंतर फडणवीसांचं सूचक वक्तव्य | devendra fadnavis calls eknath shinde group as original shivsena scsg 91

[ad_1]

सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपाच्या मुंबईतील खासदार-आमदार, पदाधिकारी, माजी नगरसेवकांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीमध्ये शाह यांनी महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वांनी सज्ज राहून, भाजपा-शिंदे गटाच्या विजयासाठी आणि भाजपाच्या वर्चस्वासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले. यावेळी शाह यांनी शिंदे गट आणि भाजपा एकत्र मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीस यांना नागपूरमध्ये या निवडणुकीमधील शिंदे गटासोबतच्या युतीसंदर्भात मोठं विधान केलं आहे. विशेष म्हणजे यावेळी फडणवीस यांनी शिंदे गटाचा केलेला उल्लेख सर्वांचं लक्ष वेधून घेणार ठरला.

नक्की वाचा >> “शिंदे गट आणि मनसे एकत्र…”; BMC Election संदर्भातील ‘तो’ प्रश्न ऐकताच फडणवीस हसत म्हणाले, “मला खूप मजा येते जेव्हा…”

‘‘भाजपा आणि जनतेला दगा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये भुईसपाट करा. धोका देणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे’’, अशी आक्रमक भूमिका घेत शाह यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युती करून भाजपा आगामी निवडणुका लढवणार असून, मुंबईसह महाराष्ट्रात भाजपाचे वर्चस्व आणि सत्ता राहील, यादृष्टीने तयारी करण्याचे आदेश शहा यांनी दिले. मुंबईला भ्रष्टाचारमुक्त करायचे आहे: आशिष शेलार गेल्या निवडणुकीत जे निसटले, ते यंदा गमवायचे नाही, असे सांगून मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यावेळी म्हणाले, मागील निवडणुकीत १३ प्रभागांमध्ये ५० ते १०० मतांनी आपला पराभव झाला. आता १५० जागांवर विजय मिळवायचा आहे. मुंबई एका भ्रष्टाचारी परिवारात अडकली असून, आता मुंबईकरांसाठीच आपल्याला मैदानात उतरायचे आहे. गेल्या निवडणुकीत अधुरे राहिलेले स्वप्न २०२२ ला पूर्ण करायचे आहे.

फडणवीस यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही आपल्या जीवनातील शेवटची निवडणूक आहे, असे समजून लढण्याचे आवाहन केलं. याचवरुन पत्रकारांनी नागपूर विमानतळाबाहेर फडणवीस यांना प्रश्न विचारला. “कुठलीही निवडणूक लढत असताना ती आपल्या जीवनातील शेवटची निवडणूक आहे असा विचार करुन तुम्ही स्वत:ला झोकून देता तेव्हाच आपल्याला ती निवडणूक जिंकता येते. हे केवळ मुंबई महानगरपालिकेसंदर्भात नव्हतं तर एकूणच निवडणुकीच्या नियोजनाबद्दल होतं,” असं फडणवीस म्हणाले.

“मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, भाजपा आणि शिवसेना ओरिजिनल म्हणजे शिंदे गट, आम्ही एकत्रित निवडणूक लढवू आणि मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवू,” असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *