प्रेग्नंसीच्या चर्चां दरम्यान बिपाशा बासूचा ‘हा’ फोटो समोर, पाहून चाहते हैराण


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. बिपाशा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या बिपाशा ही तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

बिपाशाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या लेटेस्ट फोटोशूटमध्ये बिपाशा बासू काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसते. बिपाशाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिच्या फोटोंवर कमेंट करत आहेत.  

मात्र, या फोटोंमध्ये बिपाशा फक्त तिचा चेहरा दाखवत आहे. बिपाशा अजूनही चित्रपटाच्या पडद्यापासून दूर आहे. तिचे चाहते मोठ्या पडद्यावर बिपाशा कधी परतणार याची प्रतिक्षा करत आहेत. बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हर या जोडप्याच्या घरी लवकरच एका पाहुण्याचे आगमन होणार आहे. या दोघांनी अजून अधिकृतपणे या बातमीला दुजोरा दिला नाही. 

बिपाशाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, एप्रिल २०१६ साली बिपाशा आणि करण विवाहबंधनात अडकले होते. कुटुंबिय आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत अगदी खासगी पद्धतीने दोघांचा लग्न सोहळा पार पडला होता. लग्नानंतर अनेकदा बिपाशा गरोदर असल्याच्या अफवा उडाल्या होत्या. मात्र बिपाशा आणि करणने वेळोवेळी या अफवांचं खंडन केलं. पिंकविलाच्या वृत्तानुसार, करण बिपाशा लवकरच आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना देणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सध्या दोघंही आयुष्याच्या आनंदी टप्प्यात असून आई वडिल बनण्यासाठी उत्तुक आहेत.

‘अलोन’ सिनेमाच्या वेळी बिपाशा आणि करणची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. करणचं बिपाशासोबतच हे तिसरं लग्न आहे. याआधी त्याने अभिनेत्री श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेटशी लग्न केलं होतं. मात्र ही दोन्ही लग्न फार काळ टिकू शकली नाहीत. बिपाशाला एक वर्ष डेट केल्यानंतर करण आणि बिपाशाने लग्न केलं. दोघांच्या लग्नाला आता सहा वर्ष पूर्ण झाली आहेत.

बिपाशा आणि करण सध्या बॉलिवूडपासून दुरावले आहेत. ‘कुबूल है 2.0‘ मध्ये करण ग्रोवर झळकला होता. तर बिपाशा ‘डेंजरस’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती. दोघंही सोशल मीडियावर मात्र चांगलेच सक्रिय असतात.Source link

Leave a Reply