Bigg Boss च्या स्पर्धकाकडून ‘ही’ गोष्ट साफ करण्यासाठी कडाडून विरोध…


Bigg Boss 16 M C Stan: लोकप्रिय टिव्ही शो बिग बॉस 16 प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमधून नानाविध लोकप्रिय कलाकार समील झाले आहेत. या शोमधून कोणी राजकारणी, टेलिव्हिजन कलाकार तर कॉर्ट्रोव्हर्शियस डिरेक्टर असे लोकप्रिय कलाकार समोर आले आहेत. (popular rapper mc stain says he will not wash toliet neither will cook food in bigg boss house)

या शोमधून नामवंत रॅपर एमसी स्टॅन सहभागी झाला आहे. एमसी स्टेनच्या संघर्षाची कहाणी ऐकल्यानंतर सलमान खानचे कौतुक केल्याशिवाय राहता आले नाही. सलमानने एमसी स्टेनचे कौतुक करत मला त्याचा अभिमान असल्याचे सांगितले. ‘बिग बॉस 16’ च्या प्रीमियरमध्ये एमसी स्टीनने त्याच्या नावाबद्दल तसेच कुटुंब आणि मैत्रिणींबद्दल मजेदार खुलासे केले.

परंतु बीग बॉसच्या घरात येण्यापुर्वी मात्र त्यानं एक विचित्र अट ठेवली होती. ती अट ऐकून कदाचित तुम्हालाही धक्का बसेल. ती म्हणजे बीग बॉसमध्ये येण्यापुर्वी आपण शौचालय साफ करणार नाही किंवा जेवण बनवणार नाही. 

एमसी स्टेनचे खरे नाव अल्ताफ शेख आहे. तो पुण्याचा रहिवासी आहे. स्टेनने वयाच्या 12 व्या वर्षी कव्वाली गाण्यास सुरुवात केली. त्याने प्रसिद्ध रॅपर रफ्तारसोबतही परफॉर्म केले आहे. एमसी स्टेनने अनेक गाणी गायली असली तरी त्याला लोकप्रियता ‘वाता’ या गाण्याने मिळाली. या गाण्याला यूट्यूबवर सुमारे 21 दशलक्ष व्ह्यूज मिळाले. 

हिप-हॉपमध्ये येण्यापूर्वी तो बीट बॉक्सिंग आणि बी-बॉयिंग करत होता. एमसी स्टेनचे वय केवळ 23 आहे आणि इतक्या कमी वयात तो करोडोंची कमाई करत आहे. स्टॅन 60-70 लाखांचा नेकपीस आणि 80 हजाराचे शूज घालून ‘बिग बॉस 16’ च्या प्रीमियरला पोहोचला होता. एमसी स्टीनची एकूण संपत्ती सुमारे 50 लाख आहे. युट्यूब आणि कॉन्सर्टमधून तो दरमहा लाखो रुपये कमावतो.

एमसी स्टेनने सांगितले की तो बिग बॉसमध्ये आला आहे कारण त्याला स्वतःशी संबंधित काही विवाद दूर करायचे आहेत. एमसीने खुलासा केला की तो अनम शेख नावाच्या मुलीला डेट करत आहे. काही महिन्यांपुर्वी आपल्या एक्स गर्लफ्रेंडमुळे वादाच्या भोवऱ्यात आला होता. Source link

Leave a Reply