Bigg Boss 16 साठी 1000 कोटी मानधन घेण्याच्या चर्चांवर सलमान खानने सोडलं मौन


मुंबई : बिग बॉस 16 (Bigg Boss 16) या रिअ‍ॅलिटी शोची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. या शोमध्ये नेमके कोणते कंटेस्टंट पार्टीसिपेट घेतायत? सलमान (Salman Khan) नेमकं या सीझनसाठी किती मानधन घेणार याची ही खुप चर्चा सुरू आहे. त्यात सलमान खान 1000 कोटी मानधन घेणार असल्याचेही बोलले जात होते. मात्र या सर्वं चर्चांवर आता सलमान खानने उत्तर दिले आहे. नेमकं तो काय म्हणालाय ते जाणून घेऊया. 

बिग बॉसच्या 16 व्या (Bigg Boss 16) सीझनआधी ज्या गोष्टीची सर्वाधिक चर्चा होते, ती म्हणजे सलमान खानच्या (Salman Khan)  फीची.यावर्षी सलमान 1000 कोटी मानधन घेणार असल्याचे बोलले होते. मात्र यावर शिक्कामोर्तब झालं नव्हतं. त्यात आता त्याने या चर्चावर मौन सोडलं आहे. 

फीसवर काय म्हणाला?
बिग बॉस 16 (Bigg Boss 16) संदर्भात सलमान खानने (Salman Khan)  आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली.यावेळी त्याने अनेक प्रश्नांवर उत्तर दिली होती. मानधनाच्या प्रश्नावर सलमान म्हणाला की, मला एवढे पैसे मिळाले नाहीत हे तुम्हाला माहीत आहे. इतके पैसे मला आयुष्यात कधीच मिळणार नाहीत. इतके पैसे मिळाले तर मी आयुष्यात कधीच काम करणार नाही,असे तो म्हणाला आहे. तसेच हजार-हजार कोटी रुपये मिळत असल्याच्या अफवा असल्याचे म्हणत त्याने हजार कोटी मानधनाची अफवा फेटाळली.  

आयोजकांकडे पर्याय नाहीत?
बिग बॉस (Bigg Boss 16) शो सोडण्याच्या प्रश्नावर सलमान (Salman Khan)  पुढे म्हणतो की, “मी चिडलो तर मी शो सोडतोय किंवा सोडेन असं म्हणतो, पण तसं होत नाही. हे लोक पुन्हा माझं मन वळवतात. तसेच त्यांच्याकडे कोणताही पर्यायही नसल्याचे तो म्हणालाय.  

बिग बॉस शो का करतो?
जेव्हा सलमानला (Salman Khan) विचारण्यात आले की, या शोमध्ये असं काय आहे, ज्यामुळे त्याला हा शो करावास वाटतो, यावर तो म्हणाला की,  “बरेच काही शिकण्यासारखे आहे. मी भरकटलेल्या लोकांनाही भेटतो, त्यांना पुन्हा योग्य मार्गावर आणायला आवडते. जे दादागिरी करतात आणि धमकावतो. तसेच आम्ही चार महिन्यांत एकमेकांशी चांगल बॉऩ्ड बनवतो. 

दरम्यान येत्या 1 ऑक्टोबर 2022 पासून बिग बॉस 16 (Bigg Boss 16) च्या सीझनला सुरुवात होणार आहे. या शोची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.  Source link

Leave a Reply