अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्यामध्ये मोठं भांडण; फोटो आले समोर


मुंबई : झगमगत्या विश्वात असे अनेक कपल्स आहेत, जे कायम चाहत्यांना कपल गोल्स देत आसतात. अशा जोडप्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन. ऐश्वर्या आणि अभिषेक कयम एकत्र दिसतात. दोघंही त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत. लग्नाच्या 14 वर्षानंतरही ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांमधील बॉन्डिंग खूपच मजबूत आहे. 

अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) नुकतेच दिग्दर्शत सुभाष घई यांच्या बर्थडे पार्टीमध्ये पोहचले होते. या सेलिब्रेशनमध्ये अभिषेकने ग्रे कलरचा कोट आणि पँन्ट घातली होती. तर ऐश्वर्याने ब्लू आणि सिल्व्हर कलरचा हेव्ही वर्कचा सूट परिधान केला होता.

या दोघांचे फोटो खूप व्हायरल  होत आहेत कारण हे दोन्ही स्टार्स बऱ्याच दिवसांनी कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या खास प्रसंगी चाहत्यांना ऐश्वर्या राय बच्चनचा साधा लूक आवडला, तर अभिषेक बच्चनही खूपच हँडसम दिसत होता. पण हे फोटो व्हायरल होताच एक फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या भांडणाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.

या फोटोमुळे उडाली खळबळ 
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी सुभाष घई यांच्या बर्थडे पार्टीत पापाराझींसमोर जोरदार पोज दिल्या आणि ते दोघंही खूप छान दिसत होते. यादरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेकचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये या दोन स्टार्सच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन आणि बॉडी लँग्वेज पाहून भांडणाच्या बातम्या येऊ लागल्या. 

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अभिषेक बच्चनची पाठ दिसत आहे, तर ऐश्वर्या राय बच्चनचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. या फोटोमध्ये अभिषेक बच्चनला पाहून यूजर्सना वाटतंय की तो रागात ऐश्वर्याला काहीतरी बोलत आहे आणि ऐश्वर्याही त्याच्याकडे रागाने पाहत आहे. हा फोटो व्हायरल होताच भांडणाच्या बातम्या येऊ लागल्या.

युजर्सने केल्या कमेंट्स
हा फोटो पाहून एका यूजरने लिहिलं आहे की, ‘सगळं काही ठीक नाही असं वाटतंय.’ तर दुसर्‍या यूजरने लिहिलं की, ‘असं दिसतंय की त्यांच्यात भांडण झालं आहे.’ दुसर्‍या यूजरने लिहिले- ‘या दोघांना पाहून नेहमी असं वाटतं की दोघंही खुश नाहीत.’ त्याचवेळी दुसर्‍या यूजरने लिहिले – ‘एखाद्याशी भांडण झाल्यावर असा चेहरा होतो.’Source link

Leave a Reply