घटस्फोटानंतर Arbaaz Khan चं गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? जॉर्जियाकडून मोठा खुलासा


Arbaaz Khan – Giorgia Andriani : अभिनेत्री मलायका अरोरासोबत (Malaika Arora)  घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan)  प्रसिद्ध मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) डेट करत आहे. अनेकदा दोघांचे फोटो आणि व्हिडीओ देखील इंटरनेटवर व्हायरल होत असतात. पण आता जॉर्जिया एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. अनेक वर्ष डेट केल्यानंतर जॉर्जियाने अखेर त्यांच्या नात्याबद्दल मोठी खुलासा केला आहे. जॉर्जियाने केलेल्या वक्तव्यानंतर आरबाज आणि तिचं ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगत आहे. 

मुलाखती दरम्यान जॉर्जिया म्हणाली, ‘मलायका आणि अरबाजच्या कुटुंबाला मी अनेकदा भेटली आहे. अरबाज माझा चांगला मित्र आहे आणि आमचा लग्न करण्याचा कोणताही विचार नाही. लॉकडाउन दरम्यान आमच्या नात्यात फार बदल झाले आहेत.’ (arbaaz khan – giorgia andriani)

पुढे अरबाजची गर्लफ्रेंड म्हणाली, ‘लॉकडाउन दरम्यान अनेक नाती घट्ट झाली तर काही मात्र कायमसाठी दूर झाली…’. जॉर्जियाच्या या वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. सध्या जॉर्जिया आणि अरबाजच्या नातं कोणत्या वळणावर पोहोचलं आहे, हे येणारा काळच सांगेल. ( arbaaz khan girlfriend) 

अरबाज आणि जॉर्जिया
नुकताच एका टॉक शोमध्ये अरबाजने जॉर्जियासोबत असलेल्या नात्याच्या खुलासा केला आहे. जॉर्जियामध्ये अशी कोणती गोष्ट होती जी अरबाजला प्रचंड आवडली याबद्दल अभिनेत्याने मोकळेपणाने सांगितलं आहे. 

अरबाज म्हणाला, ‘जेव्हा तुम्ही कोणत्या नात्यामध्ये असाल, तर त्याबद्दल तुम्ही पुढचा विचार करत नाही. आमच्या नात्यात आम्ही एका अशा टप्प्यावर आहोत, जेथे आम्ही नातं कसं पुढे नेवू शकतो याचा विचार करत आहोत.’ (giorgia andriani age)

जॉर्जियामधील ही गोष्ट अरबाजला प्रचंड आवडते
जॉर्जियाचा आनंदी स्वभाव अरबाजला प्रचंड आवडतो. जॉर्जिया आणि अरबाज कोरोना काळात  एकत्र होते. सोशल मीडियावर जॉर्जिया कायम अरबाजसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करायाची.  (giorgia andriani instagram)

 Source link

Leave a Reply