Big Boss 16: “एक झाला की दुसऱ्या मुलाला चिकटतेस”, शालीनची कमेंट ऐकताच संतापली टीना दत्ता, म्हणाली “स्वत:च्या बायकोची…”


Big Boss 16 Shalin Bhantot Tina Dutta Fight: बिग बॉस सध्या अंतिम टप्प्यात आहे. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी सर्वच कंटेस्टंट प्रयत्न करत असून चढाओढ सुरु आहे. यामुळेच बिग बॉसमध्ये सध्या जोरदार गदारोळ होताना दिसत आहे. दरम्यान बिग बॉसचा नवा प्रोमो समोर आला असून यामध्ये शालीन भानोत आणि टीना दत्ता यांच्यात मोठा वाद झाल्याचं दिसत आहे. हे भांडण इतकं मोठं झालं की, दोघांनी एकमेकांच्या चारित्र्यावरच बोट ठेवलं आहे. 

निम्रतच्या कॅप्टन्सीवरुन गदारोळ

टिकिट टू फायनल वीकमध्ये बिग बॉसने नम्रतला घराचं कॅप्टन बनवलं आहे. तसंच घऱातील इतर सदस्यांना निम्रतची कॅप्टन्सी काढून घ्यावी लागेल असंही सांगितलं. 

नव्या प्रोमोत बिग बॉसच्या घरात नव्या कॅप्टनवर चर्चा होताना दिसत आहे. यावेळी शिवने एमसी स्टॅनला कॅप्टन्सीसाठी निवडलं. तर एमसी स्टॅनने शिवचं नाव घेतलं. यानंतर सुंबूलने आपलं आणि शिवचं नाव घेतलं. 

शिव, एमसी स्टॅन आणि सुंबूल यांच्यानंतर शालीन भानोतने आपलं मत मांडलं. शालीनने निम्रत कौर कॅप्टन म्हणून योग्य वाटत असल्याचं सांगितलं. शालीनचे ते शब्द ऐकताच प्रियंका आणि टीना त्याच्यावर भडकतात. आमच्याबरोबर मिळून कॅप्टन्सी काढून घेण्याची योजना आखतोस आणि इथे असं सांगतोस अशा शब्दांत प्रियंकाने नाराजी जाहीर केली. तर, टीनाने हा दुटप्पीपणा असल्याचं म्हटलं. 

शालीन-टीनामध्ये जोरदार भांडण

कॅप्टन्सीवर चर्चा झाल्यानंतर टीना आणि शालीन आपापसात भिडतात. यावेळी शालीन टीनाला उद्देशून म्हणतो की, “प्लानिंग, प्लॉटिंग तुम्हीच केली. तू इतकी दुटप्पी, खोटारडी आहेस. तुझ्यापासून एक मुलगा लांब गेला की, दुसऱ्या मुलाला चिकटतेस”. यावर टीना संतापते. “तोंड सांभाळून बोल. स्वत:च्या बायकोचा आदर केला नाही आणि माझ्या चारित्र्यावर बोट उचलतोय. नालायक, मला यामुळे फरक पडत नाही”, असं टीना म्हणते. 

यावर शालीन ही तुझी हकीकत आहे असं म्हणतो. यानंतर टीना आपल्याला याच आठवड्यात घरी जायचं आहे असं सांगते. शालीन आणि टीनामधील या भांडणाचं पुढे काय होणार हे पाहावं लागेल. 
 Source link

Leave a Reply