Headlines

भोसरी भूखंड प्रकरणी फेरचौकशीचे आदेश दिल्यानंतर खडसेंचे गंभीर आरोप, म्हणाले, “मला अडकवण्यासाठी…” | Bhosari land scam eknath khadse reaction after reinvestigation rno news rmm 97

[ad_1]

भोसरी भूखंड प्रकरणी पुणे न्यायालयाने फेरचौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी सत्ताधारी पक्षातील काही मंत्र्यांकडून भोसरी भूखंड प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप केला आहे.

भोसरी भूखंड प्रकरणात यापूर्वीच काहीही तथ्य नसल्याचा अहवाल एसीबीने पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सादर केला आहे. असं असूनही राज्यातील सत्ताधारी पक्षाने हस्तक्षेप करून पुन्हा चौकशीचा ससेमिरा आपल्या पाठीमागे लावला आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. ते मुक्ताईनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

संबंधित प्रकरणावर भाष्य करताना एकनाथ खडसे म्हणाले की, भोसरी भूखंड प्रकरणात यापूर्वीही ‘अँटी करप्शन ब्युरो’नं चौकशी केली आहे. या चौकशीनंतर एसीबीनेच संबंधित प्रकरणात काहीही तथ्य नसल्याचा अहवाल पुण्याच्या सत्र न्यायालयात सादर केला. पुण्याच्या न्यायालयात मागील अठरा महिन्यापासून हा अहवाल प्रलंबित आहे. असं असताना आता राज्य सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप केला असून फेरचौकशीची मागणी केली आहे. राजकीय हेतुने सरकार पुन्हा चौकशीची मागणी करत आहे.

“यावर न्यायालयानेही आश्चर्य व्यक्त केलं आहे. न्यायालयाने म्हटलं की, हे अनोखं प्रकरण वाटत आहे. कारण तुम्हीच चौकशीअंती या प्रकरणात काहीही तथ्य नसल्याचा अहवाल सादर केला. आता पुन्हा नव्याने चौकशी करू इच्छित आहात. या टिप्पणीनंतर न्यायालयाने सरकारी पक्षाचा मागणी मान्य करत, ३१ जानेवारीपर्यंत याबाबतचा अहवाल पुन्हा सादर करण्यास सांगितलं आहे. तोपर्यंत या प्रकरणात कुणालाही अटक करता कामा नये. कारण हा राजकीय षडयंत्राचा भाग वाटतो” असं न्यायालयाने सूचित केल्याची माहिती खडसेंनी दिली.

हेही वाचा- “त्यांचा दौरा फक्त २४ मिनिटांचा” सत्तारांच्या टीकेवर उद्धव ठाकरेंची थेट प्रतिक्रिया, म्हणाले “किमान अन्नदात्याशी तरी…”

“काहीही करा आणि खोट्या गुन्ह्यामध्ये नाथाभाऊला अटक करा, असं सत्ताधारी पक्षातील काही मंत्र्यांना वाटत आहे. कारण मला अटक झाल्यानंतर त्यांचं मैदान साफ होणार आहे. त्याच अनुषंगाने कारवाई करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यापूर्वीच ईडीची चौकशी पूर्ण झाली आहे. पण आता सीबीआयची चौकशी मागे लावली आहे. एसीबीनेही पुन्हा चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून मला छळायचं, मला राजकीयदृष्ट्या नाउमेद करायचं, मला एकदा अटक झाली की त्यांना निवडणुका जिंकणं सोपं होईल” असे आरोप एकनाथ खडसेंनी केले आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *