Headlines

भोजपुरी अभिनेत्री कमाईच्या बाबतीत बॉलिवूडच्या Actressना सोडताता मागे, जाणून घ्या

[ad_1]

मुंबई : बॉलीवूडप्रमाणेच भोजपुरी इंडस्ट्रीतील सौंदर्यवतीही खुप प्रसिद्ध आहेत. सुंदरतेबाबत असो अथवा कमाईबाबत या दोन्ही बाबतीत त्या बॉलिवूड अभिनेत्रींना मागे सोडतात. मात्र निव्वळ इतक्याचं गोष्टी नाही आहेत, कमाईच्या बाबतीतही या अभिनेत्री बॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर देतात. नेमकी या अभिनेत्रींची एकूण संपत्ती किती आहे ती जाणून घेऊयात. 

भोजपुरी इंडस्ट्रीत मोनालिसा, अक्षरा सिंग, राणी चॅटर्जी आणि आम्रपाली दुबे या सौंदर्यवती खुप हिट अभिनेत्री आहेत. हिट अभिनेत्रीसह त्या कमाईच्या बाबतीत खुप पुढे आहेत. यासाठीच आज आम्ही तुम्हाला, या भोजपुरी अभिनेत्रींची नेट वर्थ काय आहे, त्याची माहिती देणार आहोत.

भोजपुरी अभिनेत्रींची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. त्यामुळे बॉलिवू़प्रमाणे या अभिनेत्री देखील चर्चेत असतात. या अभिनेत्रींच्या नेटवर्थ बद्दल बोलायला गेलं तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, आम्रपाली दुबेची (Amrapali Dubey) एकूण संपत्ती 30 कोटी रुपये आहे. एवढेच नाही तर तिची लोकप्रियताही खूप जास्त आहे.

भोजपुरी अभिनेत्री अंजना सिंग (Anjana singh) ही एक मोठी अभिनेत्री आहे. रिपोर्ट्सनुसार, अंजना सिंहची एकूण संपत्ती 21 कोटी रुपये आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. चाहत्यांना तिचा प्रत्येक व्हिडिओ आणि फोटो खूप आवडतात.

आपल्या किलर स्टाईलने जादू करणारी मोनालिसा (monalisa) चित्रपटांव्यतिरिक्त मालिकांमध्येही दिसली आहे. रिपोर्ट्सनुसार, मोनालिसाची एकूण संपत्ती 35 कोटी रुपये आहे. मोनालिसाही तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत असते.

काजल राघवानी देखील भोजपूर इंडस्ट्रीतली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपल्या डान्स व्हिडिओंनी दहशत निर्माण करणाऱ्या काजल राघवानीची (kajal raghwani) एकूण संपत्ती 14 कोटी रुपये आहे.

यानंतर नाव समोर येते ते म्हणजे, अभिनेत्री अक्षरा सिंगचे. भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग (Aakshra singh) सर्व अभिनेत्रींमध्ये सर्वात श्रीमंत आहे. रिपोर्ट्सनुसार अक्षरा सिंहची एकूण संपत्ती 50 ते 60 कोटी आहे. अक्षरा एका चित्रपटासाठी 10 ते 15 लाख रुपये घेते, तर एका स्टेज शोसाठी ती मोठी रक्कम घेते.

दरम्यान या होत्या भोजपूरी अभिनेत्री आणि त्यांचे नेटवर्थ. या अभिनेत्री बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रींना टक्कर देतात.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *