Headlines

भविष्य : पुढील महिन्यात बदलणार या 2 राशींचे भाग्य, वाचा मार्च 2022 चे राशीभविष्य

[ad_1]

मुंबई : करिअरच्या दृष्टीने मार्च महिना काही राशींसाठी खूप चांगला असेल. दोन राशीच्या लोकांना मार्च महिन्यात कामाच्या ठिकाणी खूप काळजी घ्यावी लागेल. महर्षी कपी गुरुकुलचे संस्थापक, ज्योतिषी आलोक अवस्थी यांना ‘वेदश्वपती’ यांच्याकडून जाणून घेऊ या, मार्च 2022 कसा असेल ते.

मेष : कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा खराब होण्याची शक्यता आहे, रागावर नियंत्रण ठेवा. काही वाईट घटनांमुळे मानसिक त्रास होईल. वैवाहिक संबंधांमुळे तुमच्या जीवनात काही बाधा येईल.

वृषभ : एखाद्या न्यायालयीन खटल्याबाबत त्रास होऊ शकतो. तुमचा आत्मविश्वास इतरांना अहंकार असा वाटू नये. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. तुळशीचा रस प्राशन करा. 

मिथुन: प्रियजनांच्या अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे काहीजण नाराज होऊ शकतात. आईसोबत थोडा वेळ घालवा, आईच्या प्रेमाने तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

कर्क : मुलांबाबत काही तणाव असू शकतो. आरोग्याच्या किरकोळ समस्या निर्माण होतील, आहार आणि दिनचर्या सुधारून आरोग्य सुधारण्यास सुरुवात होईल. आठवड्याच्या शेवटी काही चांगली बातमी मिळू शकते.

सिंह : वाताचा शारीरिक त्रास होईल. जास्त चालणे टाळा आणि रात्रीचे जागरण किंवा उशिरा झोपणे टाळणे चांगले.

कन्या : कुटुंबासोबत जास्त वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकार्‍यांकडून प्रशंसा होईल, ज्यामुळे मानसिक आराम मिळेल. मामाकडून काही चांगली बातमी मिळेल.

तूळ : नात्यातील संतुलन बिघडेल, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. मनाच्या थकव्याचा परिणाम शरीरावर होईल. रोज सकाळी ब्राह्मीचे सेवन करा.

वृश्चिक: आर्थिक समस्यांमुळे चिंता वाढू शकते. भविष्यकालीन पैसे साठवण्यावर लक्ष केंद्रीत करणे चांगले. वरिष्ठांकडून त्रास होईल. महिन्याच्या मध्यात काही चांगल्या बातम्या मिळतील.
 
धनु : कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याच्या समस्यांमुळे तुम्ही चिंतेत असाल. पैशाच्याबाबतीत सावधगिरी बाळगा, कोणत्याही प्रकारचे व्यवहार टाळणे चांगले असेल.

मकर : या महिन्यात कोणत्याही कार्यात आनंद मिळेल. एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या सहकार्याने यशाची नवी उमेद मिळेल. तुमच्यावर महिन्याच्या मध्यात राहूचा प्रभाव राहील, सावध राहा, अपघात होऊ शकतो.

कुंभ : नवीन संबंध किंवा भागीदारीसाठी हा महिना चांगला नाही, कार्यक्षेत्रात सावधगिरी बाळगा. इजा होण्याची शक्यता आहे प्रवासात सावधगिरी बाळगा.

मीन: मार्च महिन्यात धार्मिक रुची वाढेल आणि तुम्ही स्वतःला समजून घेण्यात अधिक वेळ द्याल. व्यायाम करताना डॉक्टरांकडे जावे लागणार नाही, याची काळजी घ्या.

((Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *