भावाच्या निधनाचा अभिनेत्रीने घेतला धसका, अशी अवस्था शत्रूची पण होऊ नये…


मुंबई : बिग बॉस 14 मधून निक्की तांबोळीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या शोमुळे निक्की घराघरात पोहोचली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर निकीने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले आहे.

एवढेच नाही तर निकीने बिग बॉसनंतर रिअॅलिटी शो खतरों के खिलाडीमध्येही भाग घेतला होता. पण निकीच्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा ती खूप अस्वस्थ झाली होती.

त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी निक्कीने तिच्या मानसिक आरोग्यासाठी ध्यानधारणा करण्यास सुरुवात केली. निक्कीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील या टप्प्याबद्दल सांगितले.

निक्कीने एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खास बातचीत केली. ती म्हणाला की, मी बिग बॉस 14 साठी खूप आभारी आहे.

गेले वर्ष माझ्यासाठी सुख आणि दुःखाने भरलेले होते. बिग बॉसनंतर मला प्रसिद्धी मिळाली, पण त्याचा आनंद साजरा करत असताना मी माझा भाऊ गमावला.असं निकिनं सांगितलं. मला वाटते की मी प्रसिद्ध होण्याची किंमत चुकवली आहे.

देवाने मला ते दिले ज्यासाठी मी खूप मेहनत करत होते. पण मी माझा भाऊ गमावला. लोक मला इतकं प्रेम देतील अशी अपेक्षा नव्हती पण काही महिन्यांनी माझ्या भावाचं निधन झालं.

निक्कीने सांगितले की, “माझ्या भावाच्या निधनानंतर मी 10 तास काहीही न खाता-पिता ध्यान करत होते. माझ्या आई-वडिलांनाही याबाबत माहित नव्हतं. खतरों के खिलाडीमध्ये असताना जेव्हाही मोकळा वेळ मिळेल तेव्हा मी ध्यान करायचे.लोकांना वाटत होते की मी झोपत आहे पण मी माझ्या मानसिक शांतीसाठी हे करत होते. मला रिअॅलिटी शोमध्येही चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर मला ट्रोल देखील केलं गेलं.”

तिच्या रोजच्या गोष्टींवर याचा वाईट परिणाम झाला होता. सध्या निक्की तांबोळी भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या खतरा खतरा या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. शोमध्ये ती स्टंट करताना दिसत आहे. या शोच्या माध्यमातून ती लोकांचं मनोरंजन करत आहे.Source link

Leave a Reply