भाऊ कदमच्या घराचं पुन्हा गोकुळ; नव्या पाहुणीचा सर्वांना लळा


मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ असं म्हणत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एक नाव म्हणजे अभिनेला भाऊ कदम. आपल्या विनोदी शैलीनं या अभिनेत्यानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. इथं वेड लावलं हाच शब्द योग्य आहे. कारण, व्यासपीठावर म्हणा किंवा मग एखाद्या कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हणा, भाऊ प्रेक्षकांसमोर येताच आता सगळ्यांना खळखळून हसण्याची संधी मिळणार याची खात्री पटते. 

असा हा भाऊ, प्रेक्षकांसोबतच अनेकांना इतका आपलासा वाटतो, की ही मंडळी त्याला ‘ओ भाऊ’ म्हणण्याऐवजी मोठ्या आपुलकीनं ‘ए भाऊ’ अशी हाक मारतात. (comedian Actor bhau kadams family baught a new pet dog watch viral video )

अशा या हक्काच्या भाऊ कदम याच्या कुटुंबावरही प्रेक्षकांचा विशेष जीव. महाराष्ट्राच्या याच लाडक्या कलाकाराच्या कुटुंबात आता एका नव्या पाहुणीची एंट्री झाली आहे. 

तिच्या येण्यानं भाऊच्या घराचं गोकुळ झालं आहे. त्याच्या मुलींनाही या नव्या पाहुणीच्या आगमनाच्या वेळी अश्रू थांबवता आले नाहीत. अशा या भाऊ कदमच्या घरी आलेली नवी पाहुणी सध्या सोशल मीडियावरही चांगलीच गाजत आहे. 

तिचं घरभर फिरणं, तिच्या मागेमागे इतरांनी धावणं, तिच्यावर भरभरून प्रेम करणं हे पाहता भाऊच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला तिनं लळा लावल्याचं पाहायला मिळत आहे. 

आता तुम्ही म्हणाल भाऊच्या या परफेक्ट फॅमिलीमध्ये आलेली ही नवी पाहुणी कोण? तर, ही नवी पाहुणी आहे त्यांच्या घरात आलेली आणि सर्वांचं भरभरून प्रेम मिळणारी डफ्फू… अर्थात नवी श्वान डॅफ्नी. 

भाऊची मुलगी मृण्मयी हिनं तिच्या इन्स्टा अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. जिथं ती ‘डॅफ्नी’चे आपल्या कुटुंबात येण्याचे सर्व क्षण शेअर करताना दिसते. इथं भाऊही या नव्या पाहुणीच्या येण्यानं कमाल आनंदात असल्याचं दिसतोय. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, जिथं ही नवी पाहुणी नकळतच सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे. Source link

Leave a Reply