Bhau Kadam आणि Kushal Badrike ला पोलिसांनी केली अटक?


Bhau Kadam and Kushal Badrike : छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hava Yeu Dya) हा शो लोकप्रिय कॉमेडी शोपैकी एक आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या शोनं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या शोनं प्रेक्षकांना हसून हसून वेड लावलं. या शोमधील कलाकार भाऊ कदम (Bhau Kadam), कुशल बद्रिके (Kushal Badrike) आणि श्रेया बुगडे (Shreya Bugade) पर्यंत सगळेच प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेनं आतापर्यंत उभ्या महाराष्ट्रांचं भरभरुन मनोरंजन केलंय. त्या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यांच्यावर संकट ओढावल्याचं चाहत्यांना वाटत आहे. इतकंच काय तर त्या दोघांच्या चाहत्यांना त्यांची चिंता वाटू लागली आहे. 

भाऊ कदम आणि कुशल या दोघांचा हा जूना व्हिडीओ आहे. भाऊ कदम आणि कुशल या दोघांविरुद्ध माजी पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. त्या दोघांविरोधात ती तक्रार पांडू चित्रपटामुळे करण्यात आली होती. पांडू चित्रपटात भाऊ कदम आणि कुशलनं पोलिसांची भूमिका साकारली होती. तर त्यावेळी ते दोघे टिंगळटवाळक्या करताना दिसले होते. 

हेही वाचा : आईशी शेवटच्या क्षणी झालेल्या संवादात ‘त्या’ गोष्टींचा उल्लेख केल्याचा Shahrukh Khan ला आजही होतोय पश्चाताप

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आपण पाहू शकतो की सेटवर कलाकार स्क्रिपटसह पुढच्या स्किटची तयारी करताना दिसले. यावेळी अचानक सेटवर पोलीस आले. हे पाहता तिथे उपस्थित असलेले सगळेच कलाकार आणि स्टाफ आश्चर्य चकीत होतात. सेटवर आलेल्या पोलिसांनी भाऊ कदम आणि कुशल बद्रिके विरुद्ध माजी पोलीस अधिकाऱ्याने या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केल्याचं सांगितलं. त्यामुळे या दोघांना सेटवरुन बाहेर जावं लागलं. सेटवरून बाहेर आल्यानंतर भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या दोघांमध्य चर्चा झाली. यानंतर ते दोघे सेटवर परतले.  

पुढे भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेनं पोलिसांसमोर त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. अभिनेते पोलिस अधिकाऱ्यांशी बोलत असताना निलेश साबळे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळी निलेश साबळे बोलतो की तुम्हाला काय वाटलं पोलीस तुम्हाला घेऊन जातील का? घाबरु नका, हे खरे पोलीस नाही. हा प्रँक आहे, असं कार्यक्रमाचा दिग्दर्शक निलेश साबळेनं सांगितलं. यानंतर भाऊ कदम आणि कुशलच्या जीवात जीव आल्याचे पाहायला मिळते. हा कार्यक्रमाचा एक भाग असून त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

‘नशीबवान’ या चित्रपटाची बहुतांशी शूटिंग ही मुलुंड मध्ये झाली आहे. ‘नशीबवान’  हा चित्रपट उदय प्रकाश लिखित ‘दिल्ली की दीवार’ या कथेवर आधारीत आहे.  हा चित्रपट 11 जानेवारी 2019 साली प्रदर्शित झाला होता. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल याची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल वसंत गोळे यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्माती अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील यांनी केली आहे. प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे यांनी या चित्रपटाच्या सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे. भाऊ कदमनं त्याच्या करिअरच्या सुरुवातील प्रचंड संघर्ष करावा लागत होता. आज भाऊ कदमनं त्याच्या अभिनयाच्या जोरावर उंचीचं शिखर गाठलं आहे.  

1991 साली भाऊ कदमनं नाटकांतून अभिनय करण्यास सुरुवात केली, तेव्हापासून त्याची अभिनय कारकीर्दीची सुरुवात झाली. त्याची लोकप्रियता झी मराठी वाहिनावरील ‘फू बाई फूच्या’ या कार्यक्रमातून झाली. भाऊ कदमनं मराठी सोबतच हिंदी चित्रपटात देखील अभिनय केला आहे. 500 पेक्षा अधिक नाटके, नऊ पेक्षा जास्त मालिका आणि चित्रपटात अभिनय केला आहे.Source link

Leave a Reply