भरलग्नात नवरदेवानं नववधूच्या लावली कानशिलात, यात नेमकी चूक कुणाची, पाहा व्हिडीओ


मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपले मनोरंजन करतात. सध्या लग्नाचा सिझन सुरू असल्यामुळे आपल्या लग्नातील अशा अनेक घटनांचे व्हिडीओ पाहायला मिळताता, जे आपल्यालं मनोरंजन करतात आणि आपल्याला पोट धरुन हसायला लावतात. परंतु सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो फारच धक्कादायक आहे. या घटनेमुळे लग्नात उपस्थीत सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

लग्नाच्या विधीदरम्यान नवरदेवानं असं काही केलं जे पाहून नेटीजन्स देखील त्याच्यावर संतापले आहेत.

लग्नादरम्यान नातेवाइकांमध्ये हाणामारी झाल्याचे तुम्ही पाहिले असेलच, परंतु वधू-वरांमध्ये भांडण झाल्याचे क्वचितच पाहायला मिळते. असाच हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नववधू आणि नवरदेव स्टेजवर उभे आहेत, त्यावेळी एकमेकांना मिठाई भरवण्याचा विधी सुरु असतो. नवरदेव नववधूला आपल्या हाताने लाडू भरवायला जातो, परंतु नववधूला तो खात नाही, ज्यामुळे नवरदेव रागवतो आणि तो लाडू नववधूच्या अंगावर फेकतो. ज्यामुळे नववधू देखील त्याच्यावर लाडू फेकते.

परंतु नववधू लाडू फेकताच नवरदेवाचा पारा चढतो आणि तो नववधूच्या कानशिलात लावतो. ज्यामुळे नातेवाईकांना त्या दोघांच्यामध्ये पडून भांडणं सोडवावी लागली. यानंतर आता या दोघांचं नातं टिकेल की नाही, हे काही सांगता येत नाही.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील संताप येईल. पण तुम्हाला काय वाटतं? यामध्ये कोणाची नक्की चूक कोणाची? नेटीजन्सने यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.

 रामसुभाग यादव नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्याखाली लोकांनी भरभरुन आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.Source link

Leave a Reply