Bharat Jodo Yatra Just as big projects are disappearing from Maharashtra 15 lakhs also disappeared Rahul Gandhi targets Modi by giving example of Foxconn Airbus msr 87राहुल गांधी यांची भारत जोडो यात्र सध्या नांदेडमध्ये आहे, आज नांदेडमधील नवा मोंढा येथे राहुल गांधी यांची सभा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला. याशिवाय, मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प बाहेर राज्यात जात असल्यावरूनही राहुल गांधी यांनी “जसे महाराष्ट्रातू मोठे प्रकल्प गायब होताय, फॉक्सकॉनचा प्रक्लप गेला. एअरबसचा प्रकल्प गेला, तसेच १५ लाखही गायब झाले.” असं म्हणत राहुल गांधी यांनी टीका केली.

यावेळी व्यासपीठावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदींसह काँग्रेस नेत्यांची उपस्थिती होती.

हेही वाचा – लालूप्रसाद यादव यांना त्यांची मुलगी रोहिणी देणार स्वत:ची किडनी; वडील आणि मुलीच्या अतुट नात्याचा प्रत्यय!

राहुल गांधी भाषणात म्हणाले, “जसे महाराष्ट्रातू मोठे प्रकल्प गायब होताय, फॉक्सकॉनचा प्रक्लप गेला. एअरबसचा प्रकल्प गेला, तसेच १५ लाखही गायब झाले.” त्यांच्या धोरणांमुळे भीती पसरत आहे. तुम्ही शेतकऱ्यांना एमएसपी देऊ नका, त्याचे कर्जही माफ करू नका, त्याला योग्य भाव देऊ नका त्याच्या मनात भीती निर्माण होते. तुम्ही तरुणांना सांगा की तुम्हाला रोजगार देणार नाही. तुमच्या आई-वडिलांनी तुमच्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केले, परंतु तुम्हाला रोजगार मिळणार नाही. त्याच्या मनात भीती निर्माण होते. कामगारांना सांगा मनरेगा बंद करू तर त्याच्या मनात भीती निर्माण होते. या भीतीला नरेंद्र मोदी आणि भाजपा द्वेषात बदलतात, हे काम करतात. भीती आणि द्वेषाच्याविरोधात ही आम्ही भारतजोडो यात्रा सुरू केली आहे.”

हेही वाचा – पक्षासाठी दहावेळा तुरुंगात जाण्यास तयार; पाठीत खंजीर खुपसणे आमच्या रक्तात नाही – संजय राऊत

याशिवाय “भारताची संपूर्ण संपत्ती दोन-तीन उद्योगपतींच्या हाती जात आहे. शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत नाही, कामगारांच्या हाताला काम नाही. देशात पैशाची काही कमी नाही. नोटाबंदी आणि जीएसटीने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेले छोटे व्यापारी, शेतकरी, छोटे आणि मध्यम व्यवसायांना नष्ट केलं आहे. काळापैसा आम्ही संपवू असा बहाणा बनवला आणि भारतीय रोजगाराचा कणा तोडला. नोटाबंदीनंतर काळापैसा गायब झाला का? उलट काळा पैसा वाढला.” असंही राहुल गांधींनी म्हटलं.

शेतकरी, कामगारांना तपस्येचं फळ मिळत नाही –

याचबरोबर, “हा देश तपस्येसमोर हात जोडतो हे सत्य आहे. तपस्या केवळ महापुरुषांनी केली नाही. मी म्हटलं हा देश तपस्वींचा देश आहे. या देशाचे शेतकरीही तपस्या करतात दिवसभर तपस्या करता. या देशातील कामगार, छोटा व्यापारी हेही तपस्या करतात. परंतु आज या देशात त्यांना तपस्येचं फळ मिळत नाही. त्यांनी २४ तास काम केलं तरी त्यांना तपस्येचं फळ मिळत नाही जे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे, मोफत नाही पण त्याच्या तपस्येसाठी, त्याने देशासाठी रक्त जाळलं आणि घाम गाळला त्यासाठी परंतु ते मिळत नाही. कामगारांचे हात फुटतात, रक्त निघतं परंतु त्यांना त्यांच्या तपस्येचं फळ मिळत नाही.” असं म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली.

तिथे एकएक तास हा १०० दिवसांसारखा असतो ; मी स्वत:ला… – संजय राऊतांनी सांगितला तुरुंगातील अनुभव!

नोटाबंदी आणि जीएसटीमुळे भारताचा कणा मोडला –

“नरेंद्र मोदींनी काही वर्षांपूर्वी नोटाबंदी केली, रात्री आठ वाजता सांगितलं, की बंधू-भगिनींनो मी ५०० आणि १००० रुपयांचा नोटा बंद करतो आहे. म्हणाले काळ्या धनाच्याविरोधात मी लढाई लढत आहे आणि त्याच्या काही दिवसानंतर त्यांनी सांगितलं की, जर काळा पैसा संपला नाही तर मला फाशीवर चढवा. काय भावना, काय शब्द होते मग अश्रूही निघाले. त्यांची वेगळी तपस्या आहे. तपस्या आहे पण वेगळी आहे. नोटाबंदी केली, चुकीचा जीएसटी लागू केला. पाच वेगवेगळे कर २८ टक्क्यांपर्यंत कर, स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच शेतकऱ्यांना कर, खतांवर कर, शेतकऱ्यांच्या अवजारांवर कर.” असं म्हणत मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांवर राहुल गांधींनी टीका केली.

ही यात्रा कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही –

“कन्याकुमारी ते श्रीनगरपर्यंत ३ हजार ६०० किलोमीटर पायी. ही यात्रा कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही, ही यात्रा श्रीनगरला जाऊन तिरंगा फडकवणार आहे. कन्याकुमारीपासून लाखो लोक या यात्रेत सहभागी झाले आहेत आणि तुम्ही आम्हाला शक्ती देत आहात, आमची मदत करत आहात. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो.” असं शेवटी राहुल गांधी म्हणाले.Source link

Leave a Reply