‘भारतात हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू….’ सिनेमावरून नाना पाटेकरांची स्पष्ट भूमिका…


मुंबई : ‘भारतातील हिंदू आणि मुस्लिम समान आहेत. दोन्ही समाज जर शांतीने राहात आहेत, तर कोणत्याही गोष्टीमुळे समाजात तेढ निर्माण होतील अशा गोष्टींना दुजोरा देवू नये….’ अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली आहे. सध्या सर्वत्र  ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत असला तरी वादाचा विषय ठरला आहे. यावर अनेक स्थरातील दिग्गज प्रतिक्रिया देत आहेत. 

नाना पाटेकर यांनी पुण्यातल्या सिम्बायोसिसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी ‘कश्मीर फाईल्स’वरून सुरू असलेल्या वादावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

ते म्हणाले, ‘मी सिनेमा पाहिलेला नाही… भारतातील हिंदू आणि मुस्लीम समान आहेत. दोन्ही समाज जर शांतीने राहात आहेत, तर कोणत्याही गोष्टीमुळे समाजात तेढ निर्माण होतील अशा गोष्टींना दुजोरा देवू नये….’ 

ते पुढे म्हणाले, ‘हिंदू आणि मुस्लीम एकमेकांशिवाय राहू शकत नाही. म्हणून त्यावरून समाजात तेढ निर्माण होणं हे योग्य नाही”, अशा शब्दांत नाना पाटेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.’

'The Kashmir Files' मुळे मोठं नाव अडचणीत; या व्यक्तीला तातडीनं Y दर्जाची सुरक्षा

बॉक्स ऑफिसवर सिनेमाचा बोलबाला…
सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतचं एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. बुधवारी म्हणजे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सहा दिवसांनंतर बॉक्स ऑफिसवर 19 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.

ट्रेड ऍनलिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार सिनेमाने आतापर्यंत जवळपास 79 कोटी 25 लाख रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सिनेमा 100 कोटींचा गल्ला पार करेल असा अंदाज वर्तवण्यात येणार आहे.Source link

Leave a Reply