Headlines

bharat gogavle replied to ajit pawar on cabinate expansion delay alligation spb 94

[ad_1]

आपले आमदार फुटण्याची भिती शिंदे गटाला आहे, असे वक्तव्य विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केले होते. त्याला शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी उत्तर दिले आहे. ”मंत्री आम्हालाही व्हायचं आहे. मात्र, आमच्यात कोणतीही नाराजी नाही”, असे ते म्हणाले. तसेच अजित पवार हे विरोधी पक्षनेते असून त्यांना काहीना काही बोलणे आवश्यक आहे, असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावला.

हेही वाचा – “नेमलेल्या १८ पैकी १४ मंत्र्यांनी अजून कार्यभार स्वीकारला नाही आणि मंत्रालयात…”, अजित पवारांचा हल्लाबोल

काय म्हणाले भरत गोगावले?

शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असून दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर ते फुटतील, अशी भिती असल्यानेच मंत्रीमंडळ विस्तार लांबणीवर जातो आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली होती. त्यावर भरत गोगावले आहे. यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ”असा कोणताही आमदार माझ्या बघण्यात नाही. मंत्री आम्हालाही बनायचे आहे. मात्र, आमच्यात कोणतीही नाराजी नाही. महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे, त्यामुळे चर्चा होणे गरजेचे आहे. त्यानुसार मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा सुरू आहे”

अजित पवारांना लगावला टोला

”अजित पवार यांना घाई झाली आहे. त्यामुळे आम्ही कधी काय बोलतो यावर त्यांचे लक्ष असते. ते विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे त्यांना काहीना काही बोलणे आवश्यक आहे. मात्र, आमच्यात कोणतीही नाराजी नाही. राज्यात ३६ जिल्हे असल्याने ३६ पालकमंत्री होऊ शकतात. मात्र, अद्याप अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. अजित पवारांना ही सर्व माहिती कुठून मिळते, हे माहिती नाही.” असेही ते म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *