Headlines

भरत गोगावले म्हणाले ‘पाच वर्ष निकाल लागणार नाही’, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “आता कोर्टालाही…” | NCP Jayant Patil on Shinde Camp MLA Bharat Gogavle Supreme Court Hearing sgy 87

[ad_1]

सत्तासंघर्षाचा निकाल पाच वर्ष लागण्याची शक्यता नाही असं खळबळजनक विधान शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केलं आहे. भरत गोगावले यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसने यावर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी न्यायालयांनाही गृहित धरुन राजकारण करण्यास काही लोकांनी सुरुवात केली असल्याची टीका प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.

भरत गोगावले काय म्हणाले आहेत –

“आम्ही मूळचे शिवसैनिक आहोत असं ते म्हणालेत. धनुष्यबाण आमचाच आहे, ७ तारखेला आम्ही तुम्हाला दाखवतो. या लोकांनी देव पाण्यात घालून ठेवले होते. अपात्र होतील सरकार कोसळेल याची वाट पाह होतो. पण मी आज सांगतो, घटनापीठाकडे गेलेल्या तक्रारीवर चार ते पाच वर्ष निकाल येणार नाही. यानंतर २०२४ ची निवडणूक आपण जिंकू आणि पुन्हा सत्तेत येऊ,” असं भरत गोगावले रत्नागितिरीत सभेत बोलताना म्हणाले आहेत.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray SC: “पुढील चार-पाच वर्ष…” सुप्रीम कोर्टातील सुनावणीसंबंधी शिंदे गटाच्या आमदाराचं खळबजनक विधान, राजकीय वर्तुळात चर्चा

जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

“न्यायालयाच्या विलंबाबाबत किती मोठा आत्मविश्वास भरत गोगावले आणि इतर आमदारांना आहे हे यातून स्पष्ट होत आहे. न्यायालयांनाही गृहित धरुन राजकारण करण्यास काही लोकांनी सुरुवात केली आहे. आता न्यायालयानेच जनतेचा विश्वास टिकवायचा की नाही हे ठरवायचं आहे,” असं जयंत पाटील म्हणाले आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *