भर पत्रकार परिषदेत अभिनेत्याचा संताप अनावर; त्याच्याकडून जे घडलं त्याचा Video Viral


मुंबई : ‘बिग बॉस ओटीटी’ आणि ‘बिग बॉस’ (Bigg Boss 15) या रिअॅलिटी शोमुळं प्रकाशझोतात असणाऱ्या अभिनेता प्रतिक सहजपाल याचं नाव आता अनेकांसाठी अनोळखी नाही. पण, ज्यांच्या तो माहित नाही, त्यांच्यासाठी… या अभिनेत्यानं आपल्या खेळानं सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला होता. 

रिअॅलिटी शोमधून बाहेर आल्यानंतर या अभिनेत्यानं काही म्युझिक व्हिडीओसुद्धा तयार केले. या व्हिडीओमुळं त्याचा चेहरा पुन्हा प्रकाशझोतात आला. सध्या प्रतिक एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आहे. 

निमित्त आहे ते म्हणजे भर पत्रकार परिषदेत सलेलं त्याचं रौद्र रुप. गाण्याच्या लाँचसाठी म्हणून प्रतीक आला, पण तिथे अभिनेत्रीच्या एका वक्तव्यावर तो जो काही भडकला ते पाहून समोर असणारे पत्रकारही थक्क झाले. 

प्रतीक सहजपाल (Pratik Sehajpal) आणि कशिका कपूर (Kashika Kapoor) यांचा एक म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला. दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांशी संवाद साधताना कशिका म्हणाली, आम्हा दोघांविषयी जे काही बोललं जात आहे ते सर्व प्रसिद्धीसाठी आहे. 

कशिकाच्या या वक्तव्यावर प्रतीक संतापत, तू या साऱ्यावर बोलू नकोस असं तिला बजावताना दिसला. त्याला उत्तर देत, मी बोलतेय म्हणजे मला काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. पण, प्रतीक मात्र यावेळी काहीही स्पष्ट करण्याच्या मनस्थितीत दिसला नाही. 

प्रतीकचा संताप इतका अनावर झाला, की तो परिषद सुरु असतानाच तिथून तडक उठून निघताना दिसला. तिथं असणाऱ्यांनी थांबवण्याचा आग्रह करुनही प्रतीक काही थांबला नाही. 

पाहता पाहता समोर असणाऱ्या पत्रकारांनाही त्याच्या या वागण्याचा धक्का बसला. काहींनी प्रतीकच्या या वागण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि तो व्हायरलही झाला. 

प्रतिक आणि कशिकामध्ये वादाची ठिणगी नेमकी का पडली हाच प्रश्न आता सर्वजण उपस्थित करताना दिसत आहेत. Source link

Leave a Reply